1.YUROPIYANANCHE BHARATAT AGAMAN..(1.युरोपियनांचे भारतात आगमन)

 


 

इयत्ता – दहावी 

विषय – समाज विज्ञान 

घटक – 1 

युरोपियनांचे भारतात आगमन


हे तुम्हाला माहित असू दे :

■1600 : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंड येथे स्थापना.

■1602 : युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची ‘नेदरलँड’ येथे स्थापना.

■1619 : मोंगल सम्राट जहांगीर याने ईस्ट इंडिया कंपनीला पश्चिम किनारपट्टीवरील सुरत आणि पूर्व किनारपट्टीवरील हुगळी येथे व्यापारासाठी परवानगी दिली.

■1639 : इंग्रजांनी मद्रास येथे आपली पहिली वखार स्थापन केली.

■1664 : फ्रान्समध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

■ ‘दिवाणी हक्क’ म्हणजे जमीन महसूल वसूल करण्याचा हक्क.

■ दस्तक : कोणताही कर न आकारता वस्तूंची आयात व निर्यात करणे; तसेच वस्तूंची ने आण करण्यास दिलेले परवानापत्र.


■ प्लासीची लढाई (1757) :

बंगालचा नबाब अलिवर्दीखान याचा 1756 मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा नातू सिराजउद्दौला हा सत्तेवर आला. सिराजउद्दौला हा तरूण नबाब होता. सिराजउद्दौला व ब्रिटीश यांच्यामध्ये 1757 मध्ये इतिहास प्रसिद्ध अशी प्लासीची लढाई झाली.

■  ‘वखारी’ म्हणजे व्यापारीमाल, धान्याची कोठारे (गोदामे) असून संरक्षणासाठी त्याच्या भोवताली तटबंदी बांधलेली असे.

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *