CHOUTHI 4. SWACHHATA GEET (चौथी मराठी पाठ 4- स्वच्छता गीत )

 


 

पाठ – 4

स्वच्छता गीत

नवीन शब्दार्थ

Ø आवार  – घराचे अंगण

Ø तुंबणे – साचणे,जमून
राहणे

Ø मोकळी – रिकामी 

Ø धुवेन – धुणे

Ø नेमाची – रोजची

Ø आंबलेले – खराब झालेले

Ø टरफले  – साली

विरुद्धार्थी शब्द

Ø स्वच्छ × अस्वच्छ

Ø नियमित ×  अनियमित

Ø उघडे ×  झाकलेले

Ø घेणे ×  देणे

समानार्थी शब्द

Ø घर – सदन , वास्तू

Ø रस्ता – पथ , वाट

Ø हात – कर

Ø तोंड – वदन





 


अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

१) प्रत्येकाने आपले घर व गाव कसे ठेवावे ?

उत्तर – प्रत्येकाने
आपले घर व गाव
स्वच्छ ठेवावे

२) तुंबलेल्या गटाराचे काय करणार आहे?

उत्तर – तुंबलेल्या गटारीतील साचलेली घाण काढून गटारी
मोकळ्या करणार आहे.

३) कागद कोठे फेकू नये ?

उत्तर – कागद
रस्त्यावर
फेकू नये

४) बिया, साली, टरफले टाकण्याची जागा कोणती ?

उत्तर – कचरा कुंडी ही बिया, साली, टरफले टाकण्याची जागा आहे.

आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.

१) आपण काय काय स्वच्छ ठेवणार आहोत ?

उत्तर – आपण नेहमी आपले घर,घराचे अंगण,गाव स्वच्छ ठेवणार आहोत.तसेच नखे,केस
स्वच्छ करून वैयक्तिक स्वच्छताही
करणार आहे.

२) सकाळी उठल्याबरोबर शरिराची स्वच्छता कशी करावी?

उत्तर –  सकाळी
उठल्याबरोबर प्रथम शौचाला जावे.नंतर हात पाय स्वच्छ धुवावेत व स्वच्छ टॉवेलने
पुसावेत.त्यानंतर दात स्वच्छ घासून अंघोळ करावी व स्वच्छ धुतलेली कपडे घालावे
अशाप्रकारे
रीराची
स्वच्छता करावी
.

३) शिळे, आंबलेले, उघडे
पदार्थ का खाऊ
नये?

 उत्तर
– कारण
शिळे,आंबलेले व उघड्यावरील अन्न खाण्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अनेक रोग होऊ शकतात.कारण अशा
अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते.  




 

इ) खालील वाक्ये वाचून त्यांचे चांगल्या सवयी व
वाईट सवयी यामध्ये वर्गीकरण कर.

चांगल्या
सवयी

वाईट
सवयी

1.     
आपले
घर
, आवार स्वच्छ ठेवावे.

1.   
तुंबलेली
गटारे स्वच्छ करू नयेत.

2.      दररोज आंघोळ करावी.

2.   
दररोज
हात
, पाय,तोंड,धुवू नयेत.

3.     
कचरा
आणि कागद रस्त्यावर फेकू नये.

3.    शिळे, आंबलेले अन्न खावे.

4.     
रस्त्यावरचे
उघडे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.

4.   
स्वच्छ
कपडे घालू नयेत

5.     
बिया,
साले,
टरफले कचरा कुंडीतच टाकावी.

5.   
नखे
वाढू द्यावीत.

 

ई) नमुन्याप्रमाणे जोड शब्द तयार कर.

उदा. पाला – पाचोळा

१) घर – दार                 २)
केर – कचरा

३) हात – पाय             ४) भाजी – भाकरी

५) चहा – नाष्टा           ६) खाणे – पिणे

७) वेणी – फणी

प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.. 


abc 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *