शब्द्समुहाबद्दल एक शब्द अभ्यास


शब्द्समुहाबद्दल एक शब्द अभ्यास

पोत्यांची, नोटांची -थप्पी

फळांचा -घोस

फुलझाडांचा- ताटवा

फुलांचा -गुच्छ

बांबूचे -बेट

भाकर्यांची, रुपयांची – चवड

मडक्यांची -उतरंड

माणसांचा  -जमाव

आंब्याच्या  झाडांची  -राई

उतारूची – झुंड, झुंबड

उपकरणांचा – संच

उंटांचा, लमाणांचा – तांडा

करवंदांची -जाळी

काजूंची, माशांची –  गाथण

किल्ल्यांचा  -जुडगा

केसांचा -झुबका, पुंजका

केसांची  -बट, जट

मुलांचा  -घोळका

मुंग्यांची – रांग

मेंढ्याचा  -कळप

लाकडांची, उसांची -मोळी

वस्तूंचा – संच

वादयांचा -वृंद

विटांचा, कलिंगडांचा  -ढीग

विद्यार्थ्यांचा  – गट

विमानांचा- ताफा

वेलींचा  -कुंज

साधूंचा – जथथा

सैनिकांचे/ची -पथक, पलटण, तुकडी

हत्तींचा- कळप

हरिणांचा- कळप

केळ्यांचा –  घड़

खेळाडूंचा  – संघ

गवताचा  -भारा

गवताची  -गंजी, पैंढी

गाईंगुरांचे -खिल्लार

गुरांचा -कळप

चोरांची, दरोडेखोरांची  -टोळी

जहाजांचा -काफिला

तारकांचा  -पुंज

तार्यांचा   – पुंजका

द्राक्षांचा -घड, घोस

दुर्वाची  -जुडी

धान्याची – रास

नाण्यांची –  चळत

नारळांचा  -ढीग

नोटांचे  -पुडके

पक्ष्यांचा – थवा

प्रवाशांची  -झुंबड

प्रश्नपत्रिकांचा  – संच

पाठ्पुस्तकांचा – संच

पालेभाजीची -गड्डी, जुडी

पिकत घातलेल्या आंब्यांची -अढी

पुस्तकांचा, वहयांचा  – गठ्ठा




Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *