SAI SURE RAGI MIX FOR STUDENTS IN KARNATAKA साई श्योर रागी हेल्थ मिक्स

बहु-पोषक साई श्योर रागी हेल्थ मिक्स मिसळून गरम दूध मोफत देण्याची योजना अंमलात आणली आहे.
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated


            पी.एम.पोषण योजनेअंतर्गत कर्नाटक राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून 3 दिवस  बहु-पोषक साई श्योर रागी हेल्थ मिक्स मिसळून गरम दूध मोफत देण्याची योजना  अंमलात आणली आहे.या योजनेंतर्गत आपल्या शाळेत पुरवठा झालेल्या  रागी हेल्थ मिक्स चा वापर कसा करावा? याचे  मिश्रण कसे करावे? व वितरण करण्याचे वेळापत्रक याची माहिती येथे घेणार आहोत..

साई श्योर रागी मिसळलेले गरम दूध तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून 3 दिवस (एक दिवसाच्या अंतराने) दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी वितरित करावे. 

बहु-पोषक साई श्योर रागी हेल्थ मिक्स मध्ये खालील प्रमुख घटक आहेत - 

👉रागीचे पीठ

👉तांदळाचे पीठ

👉सोया पीठ

👉डॅल्विन पावडर

👉मीठ

👉प्रिमिक्स्ड व्हिटॅमिन

👉खनिजे

बहु-पोषक साई श्योर रागी हेल्थ मिक्स मिसळून गरम दूध तयार करण्याची पद्धत 
(शालेय विद्यार्थ्यांसाठी उपस्थितीच्या संख्येवर अवलंबून)

प्रति विद्यार्थी 150 मिली प्रमाणे रागी हेल्थ मिक्स दूध तयार करण्याची पद्धत:

1. प्रथम 5 ग्रॅम रागीचे पीठ 10 मिली थंड पाण्यात गुठळ्या न करता मिसळणे.

2. नंतर एका भांड्यात 150 मिली शुद्ध पाणी कोमट करणे आणि त्यात 18 ग्रॅम मलईदार मिल्क पावडर घालणे व गुठळ्या न करता चांगले मिसळून 5 मिनिटे उकळणे.

3. या उकळत्या दुधात थंड पाण्यात भिजवलेले साई 
श्योर रागीचे मिश्रण ओतून नीट गुठळ्या न करता ढवळून घेणे व 5 मिनिटे पुन्हा उकळणे.


4. त्यांनतर त्यामध्ये 10 ग्रॅम साखर मिसळणे आणि 5 ते 10 मिनिटे चांगले उकळणे.आता गरम दुधात साई श्योर रागी मिसळून प्यायला तयार आहे.
स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी पाळावयाची सुरक्षा:  
1. साई 
श्योर रागी मिक्स थंड पाण्यात मिसळावे. यासाठी गरम पाणी वापरू नये आणि रागी मिक्समध्ये मिसळलेले दूध जास्त घट्ट/जाड बनवू नये.

2. साई 
श्योर रागी मिक्स कच्च्या रागीच्या पिठापासून बनवले जाते.पॅकेट उघडुन वापरल्यानंतर त्यात हवा जाऊ नये यासाठी पॅकेट घट्ट बांधले पाहिजे आणि हवाबंद प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावे.

3. रागी हेल्थ मिक्स तयार केल्यानंतर,ते एका मोठ्या भांड्यातून लहान भांड्यात ओतावे आणि मुलांना एका ओळीत बसवून साई 
श्योर बाजरी मिश्रित गरम दूध प्रत्येक विद्यार्थ्याला 150 मिली प्रमाणात वितरित करावे.

4. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करताना 150 मिली मापनाचा कप वापरणे.

5. या पद्धतीने साई 
श्योर रागी मिसळलेले गरम दूध तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून 3 दिवस (एक दिवसाच्या अंतराने) दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी वितरित करावे.

वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांना साई रागी श्योर हेल्थ मिक्स बनवण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार लागणारे प्रमाण -: 

पदार्थ प्रमाण
साई श्योर रागी मिक्स 5 ग्रॅम
दूध पावडर 18 ग्रॅम
साखर 10 ग्रॅम
पाणी 10 मिली + 150 मिली
सूचना प्रति विद्यार्थी 10 मिली पाणी रागी मिक्स साठी
प्रति विद्यार्थी 150 मिली पाणी गरम दुधासाठी
 
विद्यार्थी संख्या 10 असल्यास - 

👉50 ग्रॅम बहु-पोषक साई 
श्योर रागीचे मिश्रण + 100 मिली थंड पाणी.

👉180 ग्रॅम मिल्क पावडर + 1 कि.ग्रॅम साखर आणि 1.5 लिटर शुद्ध पाणी घालून तयार करणे.

विद्यार्थी संख्या 100 असल्यास - 

👉500 ग्रॅम पौष्टिक साई 
श्योर रागी पावडर + 1 लिटर थंड पाण्यात मिसळणे.

👉1 किलो 800 ग्रॅम मिल्क पावडर + 1 कि.ग्रॅम साखर आणि 15 लिटर शुद्ध पाणी घालून तयार करणे.


CLICK THE BELOW BUTTON TO SEE PROCESS OF PREPARATION


abc 
abc 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.