KARNATAKA 5th EVS LESSON-15.Our India - Natural Diversity आपला भारत - नैसर्गिक विविधता

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 KARNATAKA 5th EVS 

LESSON- 15 Our India - Natural Diversity 

 इयत्ता - पाचवी 

विषय - परिसर अध्ययन 

पाठ - 15

आपला भारत - नैसर्गिक विविधता 

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.201,202 वरील प्रश्न 

1) हिमालय पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी रहात असलेल्या प्राण्यांच्या नावाची यादी करा.

उत्तर –पांढरे अस्वल,हिमकुत्री,सांबर,वाघ ,चित्ता,गेंडा,निळ्या मेंढा,हत्ती,याक,रानडुक्कर,माकडे

2) हिमालय पर्वताच्या खोलगट प्रदेशात असलेल्या सपाट व रूंद प्रदेशाला डून म्हणतात.उदाहरणार्थ, भारतातील डेहराडून हे प्रसिद्ध प्रवाशी केंद्र आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक या ठिकाणी भेट देतात. कारण काय?

उत्तर - कारण डेहराडून हे शहर हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डून प्रदेशात असल्याने  येथील थंड हवामान आणि आनंददायी वातावरण असते म्हणून लोक उन्हाळ्यात डेहराडूनला भेट देतात.

 

3) तुमच्या ठिकाणाजवळ किंवा आजूबाजूला डोंगर/पर्वत रांगा/घाट असतील तर त्यांची नावे लिहा.

उत्तर –

 

4) हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका प्राण्याचे चित्र मिळव व खालील रिकाम्या जागी चिकटवून त्याबद्दल 3 वाक्ये लिही. 

हिमबिबट्या 

हा मांजर कुळातील एक दुर्मिळ प्राणी आहे.तो हिमालयातील पर्वतरांगेत आढळतो.बिबट्यापेक्षा हा आकाराने थोडा लहान असतो. 

तुम्हाला हे माहीत आहे का?

- माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर (8,848 मी) आहे.

- माउंट गॉडविन ऑस्टिन किंवा माउंट के2 (8,611 मी) हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

- मुल्लायनगिरी (1,913 मी) हे कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे.

- अन्नामुडी (2665 मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.205 वरील प्रश्न 

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.206,207 वरील प्रश्न 

1) उत्तरेकडील मैदानी प्रदेश सुपीक असण्याची कारणे कोणती?

उत्तर: गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे उत्तरेकडील मैदाने सुपीक बनली आहेत.या नद्या वाहताना हिमालयातून पोषक घटक युक्त गाळ आणतात आणि मैदानी प्रदेशातील माती समृद्ध करतात.ही सुपीक माती शेतीसाती व पिकांसाठी खूप उपयुक्त असते. 

2) नदी खोऱ्यातील मैदानी प्रदेशात जास्तीत जास्त लोक राहण्याची अपेक्षा ठेवतात. कारण काय ?

उत्तर: कारण नदी खोऱ्यातील मैदानी प्रदेशात भरपूर पाणी असते.त्यामुळे शेती,प्राण्यांचे पालन,वाहतुकीसाठी जलमार्ग,व्यापार इत्यादीसाठी मदत होते.

3. आमच्या राज्यातील प्रमुख नद्या आणि तेथील पिकांची यादी कर.

उत्तर:

नद्या: कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा ,घटप्रभा,मलप्रभा 

पिके: भात, ऊस, कापूस, भुईमूग ,तंबाखू, मका

4. भारताच्या नकाशात गंगा, ब्रम्हपुत्रा आणि यमुना नदी दाखव.5. तुम्हाला एक आव्हान (गटा गटात चर्चा करा) : नदीकाठावर स्वच्छता टिकविणें महत्वाचे आहे.आज भारतातील नद्यांचे पाणी प्रदुषीत झाले आहे. मानवाच्या अपायकारक कृती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नाश करीत आहेत.

5.आता गंगा नदीचे पाणी शुद्धीकरणाचे कार्य चालू आहे. शुद्धीकरण आवश्यक आहे का? नद्यांचे शुद्धीकरण केल्याने होणारे फायदे कोणते? इथे लिही.

उत्तर:  होय गंगा नदीसोबत सर्वच नद्यांचे शुद्धीकरण आवश्यक आहे.कारण यामुळे पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल. नदीतील जलचर प्राण्यांचे संरक्षण होईल.दूषित पाण्याने होणारे आजार कमी होतील. शेतीसाठी चांगल्या पाण्याची सोय होईल. पाणी प्रदूषण कमी होईल.

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.209 वरील प्रश्न

खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. भारतातील दोन प्रमुख पठारांची नावे लिहा.

उत्तर: 

माळवा पठार

दख्खनचे पठार 

2. दख्खनच्या पठारावरील दोन महत्वाच्या ऐतिहासिक स्थानांची नावे लिहा. 

उत्तर: 

अजंठा लेणी (महाराष्ट्र)

गोवळकोंडा किल्ला (तेलंगणा)

विजापूर (कर्नाटक)

हंपी (कर्नाटक)

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.211,212,213 वरील प्रश्न

 खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1.कर्नाटकाच्या किनारपट्टीवर कोणता समुद्र आहे?

उत्तर: कर्नाटकाच्या किनारपट्टीवर अरबी समुद्र आहे.

2.किनारपट्टीच्या प्रदेशात कर्नाटकातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ?

उत्तर: किनारपट्टीच्या प्रदेशात कर्नाटकातील उत्तर कन्नडउडुपीदक्षिण कन्नड आणि उडुपी या जिल्ह्यांचा समावेश होतो.

3.भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागातील पिकांची यादी कर.

उत्तर: तांदूळ,नारळ,सुपारी,मसाले (जसे काळी मिरी आणि वेलची),काजू आणि विविध फळे.

4.कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील आहार पदार्थाना जास्त मागणी आहे.त्यांना परदेशात निर्यात केले जाते. ते कोणते?

उत्तर: कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील काजू,मसाले इत्यादी आहार पदार्थाना परदेशात जास्त मागणी आहे.

*समुद्राच्या पाण्याच्या भागापासून अलीकडे मऊशार वाळू आणि रेतीचे मिश्रण पसरलेले। असते त्या भागाला चौपाटी (बीच) म्हणतात. यावर असे राहून तुमची नजर जाईल तितक्या दूरपर्यंत तुम्हाला समुद्र दिसतो. किनारपट्टीवर येणाऱ्या लाटा पहातांना मनांला आणि दृष्टीला आनंद मिळतो. उल्लाळमालपेकापूओम् आणि मरवंते इत्यादी चौपाट्या पहाण्यास सुंदर दिसतात. भारतातील प्रसिद्ध चौपाट्या कोणत्या हे जाणून घे आणि त्यांची नावे लिही.

उत्तर: 

कलंगुट बीच 

बागा बीच

जुहू बीच 

अलिबाग बीच 

गणपतीपुळे बीच

किनारपट्टीच्या भागात राहाणाऱ्या कोळ्यांची वेशभूषा आणि आहारपद्धती जाणून घेउन त्या बद्दल वाक्ये लिही.

उत्तर:  कोळी लोकांचे पारंपारिक पोशाख असतात. स्त्रिया लुगडे- चोळी आणि कोळी पुरुष शर्ट,लुंगी व डोक्यावर कान आणि डोळे झाकाणारी टोपी परिधान करतात.भात आणि मासे हा कोळ्यांचा प्रमुख आहार असतो.

किनारपट्टीचा प्रदेश हा व्यापाराचा महामार्ग आहे. जलप्रवासाची स्थानके म्हणजेच ज्या ठिकाणी बंदरे असून जहाजे येऊन थांबतात. नकाशाच्या सहाय्याने भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरे ओळख व त्यांची नावे लिही.

उत्तर:  पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख सागरी बंदरे:

कांडला (गुजरात)

मुंबई (महाराष्ट्र)

गोवा

नवे मंगळुरु (कर्नाटक)

कोची (केरळ)

 

जहाजांच्या चित्रांचे संग्रह कर. खाली दिलेल्या रिकाम्या जागेत चिकटव. त्यांच्या वापराबद्दल वाक्ये लिही.

उत्तर:  

जहाजे मालवाहतूक प्रवासी वाहतूक आणि लष्करी कार्यांसाठी उपयुक्त असतात.

जहाजांमधून मालवाहतूक करणे स्वस्त असते.

भारताच्या नकाशात मुंबईन्यू मंगळूरविशाखापट्टणं आणि मार्मगोवा दर्शव.5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.216,217 वरील प्रश्न

खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. ओअॅसिस म्हणजे काय ?

उत्तर:  वाळवंटात ज्या ठिकाणी आंतरजल वर आलेले असते त्याला ओअॅसिस म्हणतात.

2. वाळवंटाची कोणतीही 3 वैशिष्ट्ये लिही.

उत्तर:  वाळवंट हा कोरडा आणि वालुकामय प्रदेश असतो.

वाळवंटात उष्णतेचे प्रमाण जास्त असते.

वाळवंटात कमी प्रमाणात वनस्पती आढळतात.

3. रिकाम्या चौकटीत उंटाचे चित्र चिकटवून त्या बद्दल 4 वाक्ये लिही.

उत्तर: वाळवंटात जगू शकणारा प्राणी म्हणजे उंट असतो.वाळवंटात रहाणाऱ्या लोकांना प्रवासासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी उंटाचा वापर करतात म्हणून त्याला वाळवंटातील जहाज म्हणतात.

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.221,222वरील प्रश्न

मागील दोन वर्षात भारतात कोठे कोठे चक्रीवादळे झाली त्याच्या माहितीचा संग्रह करून त्याबद्दल लिही.

उत्तर:  💢असानी (बंगालचा उपसागर) 2022

💢सितरंग (बंगालचा उपसागर) 2022

💢हमून वादळ (बंगालचा उपसागर) 2023

💢बिपरजोय  (अरबी समुद्र) 2023

💢मोचा (बंगालचा उपसागर) 2023

 

पृथ्वी तापत आहे. अंतर्जल पातळी कमी झाली आहे. हिमालय पर्वतावरील बर्फ वितळत आहे. याला कारणे कोणती? विचार कर आणि मित्र/मैत्रिणींशी चर्चा करून त्याबद्दल खाली लिही.

उत्तर:  

💢पृथ्वीवर तापमान वाढ

💢प्रदूषण

💢जंगलतोड

💢शहरीकरण

💢लोकसंख्या वाढ

रेडिओ, टी.व्ही. आणि वर्तमान पत्रातून प्रसारीत होणाऱ्या हवामानाच्या माहितीचे आम्हाला होणारे फायदे कोणते? त्यांची यादी कर.

शेतीचे नियोजन करणे सोपे होते.

प्रवास आणि वाहतुकीसाठी उपयोग होतो.

वेळेवर हवामानाची माहिती मिळाल्यामुळे येणाऱ्या आपत्तीसाठी खबरदारी घेता येते.

हवामान विषयक लोकांना माहिती मिळते.

5वी परिसर अध्ययन पाठ्यपुस्तक पान नं.225,226 वरील प्रश्न

शिक आणि लिहीः
1)भारतातील कोणत्याही 3 संरक्षित अरण्य प्रदेशांची नावे लिही.
उत्तर:बंडीपूर,जिम कार्बेट, गिर
2)भारतात दुर्मिळ होत असलेल्या प्राण्यांच्या बाबत चर्चा तुझ्या मित्र/मैत्रीणींशी कर.तशा 3 प्राण्याची नावे लिही.
उत्तर:वाघ,हिम बिबट्या,एक शिंगी गेंडा,काळवीट इत्यादी
3)अरण्यनाशामुळे उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या? तुझ्या मित्र/मैत्रीणींशी चर्चा करून खाली लिही.
उत्तर:अरण्यनाशामुळे अनेक वनस्पती,प्राणी,पक्षी दुर्मिळ होतात.तसेच पूर,दुष्काळ,जमिनीची सुपीकता नाश होणे, समुद्राची पातळी वाढणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात.
4)तुमच्या परिसरात कोणकोणते प्राणी आढळतात याचे निरिक्षण कर व त्यांची यादी कर.


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.