5th MARATHI LESSON 19.SHRI BASAVESHWAR (पाठ 19.श्री.बसवेश्वर)

बसवेश्वरांचा जन्म विजयापुर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला.
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 इयत्ता - पाचवी 

विषय - माय मराठी 

नमुना प्रश्नोत्तरे 

19.श्री.बसवेश्वर

नवीन शब्दाचे अर्थ
उपासना- आराधना, पूजा.
परमभक्त - अतिशय भक्ति करणारा
कर्तव्यदक्ष - नेमून दिलेले कार्य करण्यात तत्पर
अध्ययन - शिकणे
युग प्रवर्तक - युग बदलविणारा
भेदभाव - वेगळेपणाची भावना
सात्विक - प्रामाणिक, सत्वगुणी
अहोरात्र - रात्रंदिवस

स्वाध्याय
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1.
बसवेश्वरांचा जन्म कोठे झाला?
उत्तर - बसवेश्वरांचा जन्म विजयापुर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला.
2.
त्यांच्या आई वडिलांची नावे सांगा?
उत्तर - बसवेश्र्वरांच्या वडिलांचे नाव मंडिगे मादिराज व आईंचे नाव मादलंबिका असे होते.
3.
बसवेश्वरांनी कोणता निश्चय केला?
उत्तर - बसवेश्वरांनी समाज सुधारणा करुन लोककल्याण साधण्याचा निश्चय केला.
4.
बसवेश्वरांचा कोणाशी विवाह झाला?
उत्तर - बसवेश्वरांचा विवाह गंगाबिंका यांच्याशी झाला.
5.
त्यांनी कोणाच्या उध्दारासाठी प्रयत्न केले?
उत्तर - बसवेश्वरांनी स्त्रियांच्या उध्दारासाठी प्रयत्न केले.
आ. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिही.
1.
बसवेश्वरांनी आपला विद्याभ्यास कोठे केला?
उत्तर - कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावर (संगमेश्वर हे एक शांत, रम्य व सुंदर मंदिर आहे.या ठिकाणी बसवेश्वरांनी आपला विद्याभ्यास केला.
2.
बिज्जल राजाला का आनंद झाला?
उत्तर - बसवेश्वरांचा प्रामाणिकपणा, सरळ व सात्विक स्वभाव, विचाराप्रमाणे आचार, राज्यकारभाराचे सामर्थ्य, लोकांच्या कल्याणाची तळमळ पाहून बिज्जल राजाला आनंद झाला.
3.
बसवेश्वरांची शिकवण कोणती?
उत्तर - 'कायकवे कैलास' म्हणजे श्रम हाच स्वर्ग.हीच बसवण्णाची शिकवण.
4.
बसवेश्वरांच्या मते खरा धर्म कसा असावा?
उत्तर - लोकांच्या कल्याणाकरिता, सुखासाठी अहोरात्र झटणे, लोकांची दुःखे दूर करणे, नेहमी सत्य बोलणे, नीतीने वागणे, परस्त्रियांना मातेप्रमाणे मानणे हाच बसवेश्वरांच्या मते खरा धर्म.
5.
लिंगायत किंवा वीरशैव धर्म म्हणजे काय?
उत्तर - ज्या धर्मात सर्वांना समान वागणूक मिळते,पुरुषांप्रमाणे स्त्रियाही ग्रंथ वाचण्याचा,देवाची पूजा करण्याचा व मोक्ष मिळण्याचा हक्क आहे.अशी शिकवण आहे.त्याला लिंगायत किंवा वीरशैव धर्म म्हणतात.

रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन वाक्ये पूर्ण कर.
1. कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर संगमेश्वर हे सुंदर मंदिर आहे.
2.
बिज्जल राजाच्या दरबारात बलदेव हा मुख्यमंत्री होता.
3.
अल्लम प्रभूदेवांच्या आशीर्वादाने त्यांनी अनुभव मंटप चर्चा मंदिर बांधले.
4.
बसवेश्वरांच्या काव्यांना असे बसववचन म्हणतात.
5.
बसवेश्वरांनी कुडलसंगम येथे समाधी घेतली.

जोड्या जुळव.
      ''                            ''
1. मंदिर                    1. बसववचन
2.
मुख्यमंत्री             2. वीरशैव
3.
काव्य                  3. संगमेश्वर
4.
धर्म                     4. युगप्रवर्तक
5.
बसवेश्वर               5. बलदेव

 

उत्तर -

      ''                            ''
1. मंदिर                    1. बसववचन
2.
मुख्यमंत्री             2. वीरशैव
3.
काव्य                  1. बसववचन
4.
धर्म                     4. युगप्रवर्तक
5.
बसवेश्वर               5. बलदेव


समानार्थी शब्द लिही
1. उपासना - पूजा
2.
दोष - उणीव
3.
सात्विक - प्रामाणिक
4.
कीर्ती - लौकिक
5.
अहोरात्र – रात्रंदिवस


ए वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर
1.
बुध्दिमान असणे : हुशार असणे
स्वामी विवेकानंद बुध्दिमान होते.
2.
संगम होणे: भेट होणे
कुडलसंगम येथे कृष्णा व मलप्रभा नद्यांचा संगम होतो.
3.
विद्याभ्यास करणे : अभ्यास करणे,शिकणे
बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट करून विद्याभ्यास केला.
4.
उदयास येणे: उगवणे
सूर्य पूर्वेला उदयास येतो.

ऐ विरुध्द अर्थाचे शब्द लिही
1. प्रामाणिक X अप्रामाणिक
2.
सामर्थ्य X शक्तिहीन
3.
गद्यरुप X पद्यरुप
4.
नीती X अनिती,कूटनिती
5.
उच्च X नीच🎯12.आता उठवू सारे रान


🎯13.एफ.एम.रेडीओ


🎯14.चतुर मैत्रीण


🎯15.देवतुल्य आई-बाबा


🎯16.दिनूचे बिल  • Telegram
  • Instagram
  • WhatsApp
  • Youtube

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.