KARNATAKA CLASS 8 Social Science ASSESSMENT 2024 MODEL QUESTION PAPER मुल्यांकन परीक्षा – 2024

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

  मुल्यांकन परीक्षा – 2024

नमुना प्रश्नपत्रिका (भाषांतर)

Assessment - March 2024

Model Paper

इयत्ता – आठवी

विषय – समाज विज्ञान 

(KSEAB बोर्डाकडून प्रकाशित झालेल्या नमुना प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असून आपल्या सोयीसाठी देत आहोत.)

अभ्यासक्रम व गुण विभागणी मुल्यांकन परीक्षा 2024

प्रश्नपत्रिका प्रश्न व गुणांची विभागणी खालीलप्रमाणे -:  

👉बहुपर्यायी प्रश्न 1 मार्क - 16 प्रश्न - एकूण 16 गुण

👉एका वाक्यात उत्तरे  1 मार्क - 4  प्रश्न - एकूण 4 गुण

👉दोन - चार वाक्यात उत्तरे  2 मार्क - 6 प्रश्न - एकूण 12 गुण 

👉तीन ते सहा वाक्यात उत्तरे  3 मार्क - 3 प्रश्न - एकूण 9 गुण 

👉आठ ते दहा वाक्यात उत्तरे 4 मार्क - 1 प्रश्न - एकूण 4 गुण 

👉नकाशा व स्थळांची नावे  1 प्रश्न -  एकूण 1+4 गुण 

💢एकूण - 50 गुणांची प्रश्नपत्रिका

 

I.खालीलपैकी प्रत्येक प्रश्न/अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत.योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांक ते 16 साठी योग्य पर्यायासह संपूर्ण उत्तर लिहा.                              16 x 1=16

1. अश्वघोषाची साहित्यकृती
A. मुद्राराक्षस

B. राजतरंगिणी

C. बुद्ध चरित

D. घो-को-की
उत्तर

2. सिंधू-सरस्वती संस्कृतीमध्ये स्वच्छतेला महत्व होते हे सांगणारे ऐतिहासिक स्थळ -
A. धोलाविरा
B.
मोहेंजोदारो
C.
कालीबंगन
D.
लोथल
उत्तर

3. अद्वैत तत्वज्ञानाचे प्रतिपादन यांनी केले.
A. बसवेश्वर
B.
रामानुजाचार्य
C.
मध्वाचार्य
D.
शंकराचार्य
उत्तर

4. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर
A. महावीर
B.
पार्श्वनाथ
C.
गौतम बुद्ध
D.
ऋषभनाथ

उत्तर
5.
चित्रात दिलेले मंदिर ओळखा.
A.बृहदेश्वर मंदिर

B. चेन्नकेशव मंदिर
C.
कैलासनाथ मंदिर
D.
काशी विश्वेश्वर मंदिर
उत्तर

6. राज्य, राज्यघटना आणि कायदे यांचा अभ्यास करणारे शास्त्र -
A. अर्थशास्त्र
B.
वाणिज्य
C.
समाजशास्त्र
D.
राज्यशास्त्र
उत्तर


7.
खालीलपैकी लोकशाहीचे फायदे आहेत
i) लोकशाही समतेच्या तत्वावर आधारित असते.
ii)
लोकशाही व्यक्तिमत्व विकासाची संधी देते.
iii)
राष्ट्रहितापेक्षा पक्षाचे हित महत्त्वाचे असते.
iv)
एका राजकीय पक्षातून दुस-या राजकीय पक्षात प्रवेश केल्याने सरकार अस्थिर होते.
A. i
आणि iii
B. ii
आणि iv
C. iii
आणि iv
D. i
आणि ii
उत्तर

8. 'संस्कृती' हा इंग्रजी शब्द या भाषेतून आला आहे
A. लॅटिन
B.
ग्रीक
C.
रोम
D.
जर्मन
उत्तर

9. औद्योगिक समाजाचे वैशिष्ट्य-
A. कृषी समाज
B.
नवीन शोधांद्वारे समाजाचे परिवर्तन
C.
गुरांचे पालन करणे.
D.
अन्नाच्या शोधात भटकणे.
उत्तर

10.या खंडात आर्टेशियन विहिरी जास्त आढळतात
A. आशिया
B.
आफ्रिका
C.
ऑस्ट्रेलिया
D.
दक्षिण अमेरिका
उत्तर

11. "मिस्ट्रल" हे याचे उत्तम उदाहरण आहे.
A. स्थानिक वारे
B.
मोसमी वारे
C.
चक्रीय वारे
D.
ग्रहीय वारे
उत्तर

12. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना वेढलेला महासागर.
A. प्रशांत महासागर
B.
हिंदी महासागर
C.
अटलांटिक महासागर
D.
आर्क्टिक महासागर
उत्तर

13. 'शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक' हे या आर्थिक उपक्रमाचे उत्तम उदाहरण आहे.
A. वितरण
B.
विनिमय
C.
उपभोग
D.
उत्पादक
उत्तर

14. राष्ट्रीय उत्पन्नाला राष्ट्राच्या एकूण लोकसंख्येने भागले असता आपल्याला हे मिळते.
A. दरडोई उत्पन्न
B.
वार्षिक उत्पन्न
C.
राष्ट्रीय उत्पन्न
D.
राष्ट्रीय निव्वळ नफा
उत्तर

15. खालीलपैकी वैयक्तिक व्यापारी संघटनेचे फायदे आहेत.
i) ते स्वतःच्या भांडवलाने सुरू करता येते.
ii)
व्यवस्थापन कौशल्ये मर्यादित असतात.
iii)
ते थेट ग्राहकांच्या संपर्कात येतात.
iv)
नफा आणि तोटा एकाच व्यक्तीला सहन करावा लागत नाही.
A. i
आणि iv
B. ii
आणि iii
C. i
आणि iii
D. ii
आणि iv
उत्तर

16. भारतात सहकारी संस्थांची सुरुवात सन........ मध्ये झाली
A. 2004
B. 1856
C. 1950
D. 1904
उत्तर

II. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वाक्यात द्या: [4 x 1 = 4]

17. भारतातील प्रागैतिहासिक कालखंडात राखेचे अवशेष सापडलेल्या गुहेचे नाव सांगा.
18.
रुढी आणि परंपरांचे उदाहरण द्या.
19.
समाजशास्त्र आपल्याला दैनंदिन जीवनात समाज समजून घेण्यास कसे सक्षम करते?
20. '
उपयुक्तता' ची व्याख्या सांगा.

III.पुढील प्रश्नांची प्रत्येकी दोन किंवा चार वाक्यात उत्तरे द्या. [6 x 2 = 12]

21.पुलकेशी II ने आपल्या साम्राज्याचा विस्तार कसा केला?
22.
मिदनापूरमध्ये सापडलेल्या कमलाची सामाजिक परीस्थिती कशी होती?
23.
समुद्र तळाशी असलेल्या भूस्वरूपाची नावे लिहा.
24.
माती प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची यादी करा.
25.
भारतातील नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती स्पष्ट करा.
26.
वितरण प्रभावीपणे कसे केले जाऊ शकते?
IV.
पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते सहा वाक्यात द्या [3 x 3 = 9]
27. कलिंग युद्धानंतर राजा अशोकाने आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली.स्पष्ट करा.
28.
ग्लोबची आकृती काढून त्यावर प्रमुख सात अक्षवृत्ते दाखवा व नावे द्या.
29.
विदेशी व्यापाराचे मुख्य प्रकार स्पष्ट करा.
V.
पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी आठ ते दहा वाक्यात द्या : [4 x 1 = 4]
30. गावाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य महत्वाचे आहे.सिद्ध करा.
31.
भारताचा नकाशा काढा आणि खालील ठिकाणे दाखवा. [1 + 4 = 5]
अ) मगध
ब) मथुरा
क) तलकाडू
ड) तंजावर

आठवी पाठ्यपुस्तकातील विभागाची उत्तरे या एकाच पेजवरती उपलब्ध होतील...

स्वाध्याय पाहण्यासाठी पाठांच्या नावावरती स्पर्श करा... 

 
Si.No. Subject Link
  1 मराठी प्रश्नोत्तरेCLICK HERE
2 Kannada (SL)CLICK HERE
3 Kannada (TL) CLICK HERE
4 English (TL) CLICK HERE
5 Science PART-1 CLICK HERE
6SCIENCE PART-2CLICK HERE
7 SOCIAL SCIENCE CLICK HERE
8 NMMS EXAM Practice Test CLICK HERE
9 BOARD EXAM Model QP CLICK HERE
10 मराठी व्याकरण CLICK HERE
11 English Grammar CLICK HERE
 

1 टिप्पणी

  1. Math question paper model exam
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.