9TH SS 19.MODERN EUROPE (आधुनिक युरोप)

धार्मिक सुधारणांमुळे ख्रिश्चन धर्माचे अनेक पंथांमध्ये विभाजन झाले, राष्ट्रवादाचा उदय झाला.
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

राज्य - कर्नाटक

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान

विभाग – इतिहास

सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार

प्रकरण – 19.आधुनिक युरोप

स्वाध्याय

 स्वाध्याय

1. खालील रिकाम्या जागा योग्य शब्दानी भरा.

1. 'रेनायझन्स' म्हणजे पुनर्जन्म किंवा पुनरुज्जीवन.

2. पुनरुज्जीवनाचा जनक पेट्रार्क याना म्हणतात.

3. मार्टिन ल्युथरच्या अनुयायाना प्रोटेस्टंट  म्हणतात.

4. प्रतिसुधारणा चळवळीचा नेता इग्नेशियस लायोला

5. 'स्पिनिंग जेनी' यंत्राचा शोध जेम्स हरग्रीव्हज याने लावला.


2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. धर्मसुधारणेचे परिणाम कोणते ?

उत्तर -धर्मसुधारणेचे परिणाम खालीलप्रमाणे - 

1) धार्मिक सुधारणांमुळे ख्रिश्चन धर्माचे अनेक पंथांमध्ये विभाजन झाले, राष्ट्रवादाचा उदय झाला.
2) युरोपातील अनेक देशांचे राजे पोपच्या वर्चस्वातून मुक्त झाले.
3) धर्मसुधारणेमुळे राष्ट्रवादांचा उदय झाला.
4) चर्चची जप्त केलेली संपत्ती आर्थिक विकासासाठी वापरण्यात आली.
5) राष्ट्रीय भावना आणखी प्रबळ झाली आणि युरोपच्या राजांनी धार्मिक सहिष्णुतेचा स्विकार केला.

2. भौगोलिक संशोधनासाठी कारणीभूत घटक कोणते ते लिहा.

उत्तर - भौगोलिक संशोधनासाठी खालील घटक कारणीभूत ठरले - 

👉इ.स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी कॉन्स्टॉन्टिनोपल हे शहर काबीज केले.
👉ख्रिश्चन धर्मगुरुंना ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी नवीन देश शोधावे असे वाटत होते.
👉भारतात येण्यासाठी नवीन व्यापारी मार्गांचा शोध,
👉सागरी व्यापारातील स्पर्धा,
👉इतर संस्कृतींबद्दल कुतूहल
👉नाविकांसाठी होकायंत्र,ग्रहोन्नतीमापक आणि अचूक नकाशे यासारख्या उपकरणांमुळे समुद्र सफारीला प्रेरणा मिळाली.

3. लिओनार्दो-द-विन्सीच्या मुख्य कलाकृती कोणत्या ?

उत्तर -'अंतिम भोजन' (Last Supper),मोनालिसा या लिओनार्दो-द-व्हिन्सीच्या मुख्य कलाकृती होय.

4. पुनरुज्जीवन काळातील साहित्याच्या विकासाचे उदाहरणासहित विवरण करा.

उत्तर -पुनरुज्जीवन काळात साहित्य धर्माऐवजी संसारिक बाबींवर केंद्रित होते.पेट्रार्कला 'पुनरुजीवनाचा जनक' असे म्हणतात.त्यानी सुमारे 200 लॅटिन आणि ग्रीक हस्तलिखितांचा संग्रह केला होता.बोकेशियोने इटालियन भाषेत लिहिलेल्या 100 कयांचा संग्रह 'डेकॉमेरनि', डान्टेने लिहिलेल्या प्रसिध्द कृती म्हणजे 'डिव्हाईन कॉमेडी', इंग्लंडच्या चॉसरने लिहिलेल्या 'कॅन्टरबरीटेल्स' शेक्सपीयरचीप्रसिध्द सुखान्त व दुःखान्त नाटके हे या पुनरुजीवन काळातील इतर साहित्यकृती होत्या.

5. औद्योगिक क्रांतीचे परिणाम सांगा.

उत्तर -औद्योगिक क्रांतीने लक्षणीय बदल घडवून आणले, जसे की कारखान्यांचा उदय झाला.तांत्रिक प्रगती झाली.भांडवलशाहीची वाढ झाली.लोक ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर झाले.गृह उद्योगाचा नाश,मालक आणि कामगार यांच्यातील संबंध बिघडले.

  • Telegram
  • Instagram
  • WhatsApp
  • Youtube

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.