9th SCIENCE 7.Diversity in Living Organism (7.सजीवांमधील विविधता)

सजीवांच्या वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक या मूलभूत गुणधर्मांचा विचार केला जातो.
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

 इयत्ता - नववी 

विषय - विज्ञान 

भाग - 1 

प्रकरण - 7 

सजीवांमधील विविधता

  

 

1.सजीवांची वर्गीकरण आपण का करतो?
उत्तर - कारण सजीवांची ओळख पटण्यासाठी व जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपण सजीवांचे वर्गीकरण करतो.
2.
आपल्या सभोवताली दिसणाऱ्या सजीवांची तीन विभिन्न उदाहरणे द्या.
उत्तर - अमिबा,मानव व नारळाचे झाड
3.
सजीवांच्या वर्गीकरणांमध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म महत्त्वाचा आहे?
उत्तर - कोणत्या प्रकारच्या पेशींनी बनलेले आहेत व का? कारण सजीव हे एकपेशीय व बहुपेशीय आहेत.
4.
सजीवांच्या वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या मूलभूत गुणधर्मांचा विचार केला जातो?

उत्तर - सजीवांच्या वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक या मूलभूत गुणधर्मांचा विचार केला जातो.
5.
कोणत्या गुणधर्माच्या आधारे प्राणी व वनस्पती यांना वेगवेगळ्या वर्गात घातले आहे?
उत्तर -हरितकणांच्या आधारे
6.
कोणत्या सजीवांना प्राचीनकाळचे सजीव म्हणतात?हे सजीव आधुनिक सजीवांपेक्षा कसे वेगळे आहेत?
उत्तर - निलहरित शेवाळांना प्राचीनकाळचे सजीव म्हणतात.त्यांची शरीर रचना साधी असते व आधुनिक सजीव संयुक्त गुंतागुंतीची रचना दर्शवितात.
7.
कोणत्या कसोटीवर सजीवांचे वर्गीकरण मोनिरा किंवा प्रोटिस्टा सृष्टीमध्ये करतात?
उत्तर -प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक कसोटीवर सजीवांचे वर्गीकरण मोनेरा किंवा प्रोटिस्टा सृष्टीमध्ये करतात.

 
8.
जे सजीव एकपेशीय व युकॅरिओटिक आहे त्याचे वर्गीकरण तुम्ही कोणत्या सृष्टीत कराल?
उत्तर -अशा सजीवांचे वर्गीकरण प्रोटिष्टा सृष्टीत करू.
9.
वर्गीकरणाच्या स्तरांमध्ये कोणत्या गटांमध्ये जास्तीत जास्त एकसारखे गुणधर्म असणारे पण संख्येने कमी सजीव व कोणत्या गटांमध्ये जास्त संख्येने सजीव आढळतात?
उत्तर - वर्गीकरणाच्या स्तरांमध्ये मोनेरा गटामध्ये जास्तीत जास्त एक सारखे गुणधर्म असणारी पण वनस्पती संख्येने कमी आणि प्राणी गटांमध्ये जास्त संख्येने सजीव आढळतात.
10.
अतिशय साध्या वनस्पती कोणत्या गटात आढळतात?
उत्तर -बहुपेशीय सजीव या गटात अतिशय साध्या वनस्पती आढळतात.
11.
फॅनरोगॅमस् व टेरिडोफाईट वनस्पतीतील फरक सांगा.
उत्तर –

फॅनरोगॅमस्

टेरिडोफाईट

* त्यांना ही सपुष्प वनस्पती आहे.
* बीज तयार होते.
* प्रजननाचा अवयव आहे (फूल)

* टेरिडोफायटा ही अपुष्प वनस्पती आहे.
* बीज तयार होत नाही.
* प्रजननाचा विजय लपलेला असतो.

   

12.जिम्नोस्पर्मस् व अँजिओएस्पर्मस् मधील फरक सांगा.
उत्तर –

जिम्नोस्पर्मस्

अँजिओएस्पर्मस्

*उघडे बीज असणारी वनस्पती आहे.
*प्रजननाचा अवयव नर/मादी शंकू आहे.
*पुष्प वनस्पती आहे.
*यामध्ये बिया असतात पण फळे नसतात.

*यामध्ये झाकलेले बी असतात.
*फूल हा प्रजननाचा अवयव असतो.
*सपुष्प वनस्पती आहे.
*यामध्ये फळे व बिया दोन्ही असतात.


13.एकदल व द्विदल वनस्पती मधील फरक सांगा.

उत्तर –

एकदल वनस्पती

द्विदल वनस्पती

* याची पाने लांब व समांतर शिराविण्यास असणारी असतात.
* याची मुळे तंतुमय असतात.
* यातील बीजाला एकच दल असते.
* फुलांच्या पाकळ्या तीन-चार पट असतात.
* उदा.- जोंधळा,मक्का,मोहरी

* याची पाने जाळीदार शिरविण्यास असणारी असतात.
* याची मुळे प्रधानमुळे किंवा सोटमुळे असतात.

* यातील बिजाला दोन दले असतात.
* यातील फुलांच्या पाकळ्या पाच सहा पट असतात.
* उदा. वाटाणा,शेंगा हरभरा

 
प्रश्न :
1. आंतरगृही प्राणी व सच्छिद्र प्राण्यांमधील फरक सांगा.

उत्तर –

आंतरगृही प्राणी

सच्छिद्र प्राणी

* शरीरावर षुंडके असतात.
* शरीरावर छिद्रे नसतात
* शरीर गोलाकार समिती दर्शवते.
* एखाद्या पदार्थावर चिकटून राहत नाहीत. हालचाल करतात.
* हायड्रा,जेलीफिश इत्यादी.

*शरीरावर सुंडके नसतात.
*शरीरावर असंख्यछिद्रे असतात
*शरीर असममिती दर्शविते.
*एखाद्या पदार्थावर चिकटून राहतात.हे हालचाल करत नाहीत.
स्पंज,सायकॉन इत्यादी


2.
वलयांकित कृमी आणि संधिपाद प्राण्यामधील फरक सांगा.

उत्तर –

वलयांकित कृमी

संधिपाद प्राणी

* शरीरावर वलय असतात.
* देहगुहा नसते.
* काही सजीव द्विलिंगी असतात.
* सजीव उडू शकत नाहीत.
* गांडूळ जळू इत्यादी.

* शरीरावर वलय नसतात.
* देहगुहा नसते.
* सजीव एकलिंगी असतात.
* काही सजीव उडू शकतात.
* फुलपाखरू झुरळ इत्यादी.

3.
उभयचर प्राणी व सरपटणारे प्राणी यांच्यामधील फरक सांगा.

उत्तर –

उभयचर प्राणी

सरपटणारे प्राणी

* जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहतात.
* कल्ले,त्वचा व फुफ्फुसामार्फत हालचाल करतात.

* त्वचेमध्ये श्लेषमल ग्रंथी असतात.
* अवस्थांतर क्रिया घडते.
* उदा.टोड,बेडूक इत्यादी.

*फक्त जमिनीवर राहतात.
*फक्त फुफुसाद्वारे हालचाल करतात.
*त्वचेमध्ये श्लेषमल ग्रंथी नसतात
*अवस्थांतर क्रिया घडत नाही.
*उदा.कासव सरडा

 
4.
पक्षी वर्गातील प्राणी व सस्तन प्राण्यांमधील फरक सांग.

उत्तर –

पक्षी वर्ग

सस्तन प्राणी

* हवा पाणी जमीन तिन्ही ठिकाणी राहतात.
*शरीरावर पंख नसतात.
*सजीव अंडज आहेत.
*चोच असते.
*छातीवर स्तन ग्रंथी नसतात.
*उदा.बदक शहामृग इत्यादी.

* फक्त जमिनीवर राहतात.
* शरीरावर पंख नसतात.
* सजीव जरायुज आहेत.
* चोच नसते (दात असतात)
* छातीवर स्तन ग्रंथी असतात.
* उदा.मानव वाघ इत्यादी.


अभ्यास
1.
सजीवांच्या वर्गीकरणाचे फायदे लिहा.
उत्तर –शास्त्रीय नावे समजतात.जाती आणि प्रजाती समजतात.जीवशास्त्राचा अभ्यास करणे सोपे जाते. इत्यादी सजीवांच्या वर्गीकरणाचे फायदे आहेत.
2.
कोणते दोन गुणधर्म तुम्ही वर्गीकरणाचा पदानुक्रम तयार कराल ?
उत्तर –पेशींची रचना प्रजनन व प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक हे गुणधर्म वापरून वर्गीकरणाचा पदानुक्रम तयार करू.
3.
वनस्पतींच्या पाच मुख्य सृष्टी कोणत्या? हे वर्गीकरण कोणत्या गुणधर्मांच्या आधारे केले आहे?
उत्तर –

थॅलोफायटा (बहुपेशीय शेवाळ)
ब्रायोफायटा (अमुली वनस्पती)
टेरिडोफायटा (अबिजी वनस्पती )
जिम्नोस्पर्म (अनावृत्त बीज वनस्पती)
अँजिओस्पर्मस् (आवृत्ती बीज वनस्पती)
अशा वनस्पतींच्या पाच सृष्टी आहेत.
पेशींची रचना,मूलस्थान,अवयव,पोषण आणि प्रजनन हे गुणधर्म वापरून वर्गीकरण केलेले आहे.
4.
कोणत्या गुणधर्मांच्या आधारे सजीव सृष्टीचे पाच सृष्टीमध्ये वर्गीकरण केले आहे?
उत्तर –पेशींची रचना,मूलस्थान,अवयव,पोषण आणि प्रजनन या गुणधर्माच्या आधारे वर्गीकरण केलेले आहे.


5.
वनस्पतींच्या वर्गीकरणातील आधार गुणधर्म प्राण्यांच्या वर्गीकरणातील आधार गुणधर्मापेक्षा कसा वेगळा आहे?
उत्तर –

वनस्पती - वनस्पती स्वयंभूशीत आहे त्यांच्यामध्ये हरितकण असतो पेशीमध्ये हालचालीसाठी अवयव नाहीत यांच्यामध्ये प्रकाष्ट व परिकाष्ट या दोनच ऊती असतात.
प्राणी- परपोषित आहेत.त्यांच्या पेशीमध्ये हरितकण नसतो.हालचालीसाठी त्यांना प्रगतशील अवयव आहेत. तसेच त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आढळतात.
6.
पृष्ठवंशी प्राण्यांचे उपगटांमध्ये कसे वर्गीकरण केले आहे ते सांगा.
*पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड असते.
*पाठीमागील बाजूला मज्जा रज्जू आढळते.
*हे त्रिस्तरी असतात.
*त्यांच्यामध्ये कल्ल्याच्या पिशव्यांची एक जोडी आढळते.
*यांच्यामध्ये देहगुहा असतो.
गट -
मत्स्यवर्ग सागरी घोडा मासा स्प्रिंग रे
उभयचर प्राणी बेडूक,टोड इत्यादी.
सरपटणारे प्राणी साप,कासव,मगर इ.
पक्षी कावळा बदक शहामृग इत्यादी
सस्तन वर्ग मानव माकड इत्यादी

 

1.आपल्या सभोवतालचे द्रव्य

2.आपल्या सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे ? 

3.अणू आणि रेणू 

4.परमाणूची रचना 

5.सजीवांचा मूलभूत घटक 

6.ऊती 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.