9th Science 4.Paramanuchi Rachana 4.परमाणुची रचना

9वी विज्ञान 4.परमाणुची रचना
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

इयत्ता - नववी 

विषय - विज्ञान 

 4.परमाणुची रचना पान नं.:72 वरील प्रश्नांची उत्तरे

1. कॅनॉल किरणे काय आहेत?
उत्तर - कॅनॉल किरण म्हणजे ॲनोड किरण.हे धनभारीत असतात.त्यांना प्रोटॉन्स म्हणतात ते वस्तुमानाने जड असतात.

2. जर एका परमाणूत एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आहेत, तर त्यात कांही प्रभार असेल की नाही.
उत्तर - येथे प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही भार नाही.म्हणजेच तो भाररहीत आहे.

पान नं.:77 वरील प्रश्नांची उत्तरे

1. परमाणू उदासीन आहे हे तथ्य थॉमसन प्रतिकृतीच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर – i)परमाणु धनु प्रभारीत गोळ्याचा बनलेला असतो आणि इलेक्ट्रॉन त्यात रुतून बसलेले असतात.

ii) ऋणभार आणि धनभार समान किंमतीचे असतात.म्हणून परमाणु हा विद्युतच्या दृष्टीने उदासीन असतो.
2. रुदरफोर्डच्या प्रतिकृतीनुसार परमाणूच्या केंद्रात असणारा परमाणू पेक्षा लहान कण कोणता ?
उत्तर - प्रोटॉन

3. तीन कक्षा असणाऱ्या परमाणूचे बोरच्या प्रतिकृतीनुसार आकृती काढा.
उत्तर - ॲल्युमिनियम Al= 13
     K    L    M 

     2    8    3

4. सुवर्ण पत्री ऐवजी दुसऱ्या धातूची पत्री वापरून अल्फा कणांच्या विचलनाचा प्रयोग करता येईल कां?
उत्तर - नाही.
कारण सोन्याचा पत्रा प्रसरणशिलत्व व तंतुभवनशीलत्व गुणधर्म दर्शवितो.

पान नं.:77 वरील प्रश्नांची उत्तरे

1. परमाणूचे तीन परमाणूपेक्षा लहान कणांची नावे लिहा.
उत्तर - प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन
2. हेलियम परमाणूचे परमाणू वस्तुमान 4u आहे आणि त्याच्या केंद्रात दोन प्रोटॉन्स असतात. त्यात न्यूट्रॉन्स किती असतील?
उत्तर - न्यूट्रॉनची संख्या = 2

पान नं.:78 वरील प्रश्नांची उत्तरे

1. कार्बन आणि सोडियमच्या परमाणूमधील इलेक्ट्रॉन्सचे वितरण स्पष्ट करा.  
उत्तर - कार्बन C =6        
                K , L                  
                2 , 4
 

    सोडियम Na = 11
        K , L , M

        2 , 8 , 1

 

2. जर एका परमाणुच्या K आणि L कक्षा भरलेल्या आहेत तर त्या परमाणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल?
उत्तर - इलेक्ट्रॉनची संख्या 10 असेल आणि तो मुलद्रव्य म्हणजे निऑन.

पान नं.:80 वरील प्रश्नांची उत्तरे

1. क्लोरीन सल्फर आणि मॅग्नेशियमच्या परमाणु संख्येने संयुजा कशी प्राप्त कराल?
क्लोरीन= 17
2 , 8 , 7
संयुजा = 1

सल्फर = 16
2 , 8 , 6
संयुजा = 2

मॅग्नेशियम = 12
2 , 8 , 2
संयुजा = 2

पान नं.:81 वरील प्रश्नांची उत्तरे

1. परमाणुतील इलेक्ट्रॉनिक्स 8 आणि न्यूट्रॉन्स 8 असतील तर-
i) परमाणु अंक किती?
परमाणु अंक =8
ii)
परमाणुचा भार कोणता?
परमाणुचा भार =16
✍️हा मूलद्रव्य ऑक्सिजन होय.

2. तक्ता 4.1 च्या मदतीने ऑक्सिजन आणि सल्फर परमाणुचे वस्तुमानांक काढा?
ऑक्सिजन = 8 अणुवस्तुमानांक = 16
सल्फर = 16 अणुवस्तुमानांक = 32

पान नं.:83 वरील प्रश्नांची उत्तरे

1. H , D आणि T या चिन्हांच्या परमाणुतील परमाणुपेक्षा लहान कणांचा तक्ता तयार करा.
लहान कण हायड्रोजन होय.

= 1H1   

 

2.समस्थानिक आणि समभाराच्या एका जोडीचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
उत्तर -

समस्थानिक जोडी - 

     6C12  , 6C13
समभाराची जोडी -

20Ca40  ,  18Ar40       2 , 8 , 10                      2 , 8 ,  8 

स्वाध्याय 

1. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या गुणधर्मांची तुलना करा.
उत्तर - प्रोटॉन
👉प्रोटॉन हा धनभारीत कण आहे.
👉प्रोटॉन मूलद्रव्याच्या अणूकेंद्रात असतात.
👉प्रोटॉन = P+
2. जे.जे.थॉमसनच्या परमाणू प्रतिकृतीच्या मर्यादा कोणत्या?
उत्तर - थॉमसनच्या नमुना मुळे परमाणुच्या उदासीन होण्याचे कारण समजले तरी दुसऱ्या वैज्ञानिकांना केलेल्या प्रयोगाच्या परिणामाचा नमुना समजावून सांगू शकले नाहीत.

3. रुदरफोर्डच्या परमाणू प्रतिकृतीच्या मर्यादा सांगा.
उत्तर - इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेमधील परिभ्रमण हे स्थिर असू शकत नाही.वर्तुळाकार कक्षेतील कणांवर प्रवेग निर्माण होऊ शकतो.प्रवेग निर्माण होत असताना प्रभारीत कण ऊर्जा उत्सर्जित करतात म्हणून परिभ्रमण करीत असणाऱ्या इलेक्ट्रॉनने ऊर्जा गमावल्याने तो केंद्रकाच्या आत खेचला जाऊ शकतो.अशा परिस्थितीत परमाणु अस्थिर झाल्याने आपल्याला माहिती असणाऱ्या स्वरूपात द्रव्य अस्तित्वात राहू शकत नाही.परमाणु हे अगदी स्थिर असतात हे आपल्याला माहित आहे.
4. बोरच्या परमाणू प्रतिकृतीची व्याख्या सांगा.
उत्तर - इलेक्ट्रॉनिक्स वर्तुळाकार कक्षेत फिरतात.
प्रत्येक कक्षा ठराविक उर्जेने परिपूर्ण असते म्हणून त्यांना ऊर्जा पातळी असे म्हणतात.
इलेक्ट्रॉन 2n2 या सूत्राने भरतात.

5. या प्रकरणात दिलेल्या सर्व परमाणू प्रतिकृतींची तुलना करा.
👉थॉमसन प्रतिकृती -
या प्रतिकृती द्वारे इलेक्ट्रॉनचा शोध लागला.
परमाणु हा भरीव गोळा असून त्यामध्ये इलेक्ट्रॉन रूतून बसलेले असतात.
परमाणु धनभार व ऋणभार समान किंमतीचे असतात. परमाणु उदासीन/भाररहीत असतात.

👉रुदरफोर्ड प्रतिकृती-
या प्रतिकृतीद्वारे परमाणु केंद्राची माहिती मिळाली.
परमाणु केंद्र धनभारित असून त्यामध्ये सर्व वस्तुमान असते.
केंद्र अणुच्या तुलनेत आकाराने लहान असतो.
या प्रतिकृतीसाठी अल्फा कणांचा व सोने या धातूचा वापर केला.

👉नेल्स बोर प्रतिकृती -
या प्रतिकृती द्वारे इलेक्ट्रॉन्स हे कक्षेत फिरतात.ते ठराविक ऊर्जेच्या स्वरूपात दिसतात.
कक्षेत या सूत्राने इलेक्ट्रॉन्स भरलेले असतात.
 
6. पहिल्या 18 मूलद्रव्यांच्या कक्षांमधील इलेक्ट्रॉन वितरणाचा नियम.

मूलद्रव्याचे नाव

K

L

M

हायड्रोजन

2

-

-

हेलियम

2

-

-

लिथियम

2

1

-

बेरियम

2

2

-

बोरॉन

2

3

-

कार्बन

2

4

-

नायट्रोजन

2

5

-

ऑक्सिजन

2

6

-

फ्लोरिन

2

7

-

निऑन

2

8

-

सोडियम

2

8

1

मॅग्नेशियम

2

8

2

ॲल्युमिनियम

2

8

3

सिलिकॉन

2

8

4

फॉस्फरस

2

8

5

सल्फर

2

8

6

क्लोरीन

2

8

7

अरगॉन

2

8

8

 
7. सिलिकॉन आणि ऑक्सिजनचे उदाहरण घेऊन संयुजेची व्याख्या लिहा.
उत्तर - मूलद्रव्याच्या बाह्य कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन्स जे रासायनिक क्रियेत भाग घेतात.त्यांना मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात.
सिलिकॉन - 14
इलेक्ट्रॉन्स विभागणी - 2 , 8 , 4
संयुजा - 4

ऑक्सिजन - 8
इलेक्ट्रॉन्स विभागणी - 2 , 6
संयुजा - 2

8. उदाहरणांसह स्पष्ट करा.
उत्तर - (i) परमाणू अंक - मूलद्रव्याच्या अणुकेंद्रात असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्येला परमाणु अंक असे म्हणतात.
उदा.

(ii)
वस्तुमानांक - मूलद्रव्याच्या अनु केंद्रात असणाऱ्या प्रोटॉन्स आणि न्यूटनच्या एकूण संख्येला वस्तुमानांक असे म्हणतात.
उदा.

(iii)
समस्थानिक - मूलद्रव्याचा अणूक्रमांक समान पण अणूवस्तुमान भिन्न असतो.तेव्हा त्या समस्थानिक असे म्हणतात.
उदा.
(iv)
समभार - दोन मूलद्रव्यांच्या जोडीत अनुक्रमांक भिन्न पण अनुवस्तुमान समान असतात.तेव्हा त्या मूलद्रव्यांना समभार मूलद्रव्य असे म्हणतात.
उदा.

9. Na+ ने K आणि L कवचे पूर्णपणे भरलेले आहेत. विवेचन करा.
उत्तर -    Na+ = 11 - 1
                     = 10 
                   K = 2
   L = 8
👉येथे धनभार इलेक्ट्रॉन कमतरता दर्शवितो.
👉सोडियमने एक इलेक्ट्रॉनिक्स गमविला तेव्हा तो कॅटायन Na+ बनला.म्हणून K आणि L कवच पूर्ण भरलेले असतात.

 
10. जर ब्रोमीन परमाणू दोन समस्थानिकांच्या Br (49.7%) आणि Br (50.3%) रूपात आहेत.तर ब्रोमीन परमाणूचे सरासरी परमाणू वस्तुमान काढा.
11. एक मूलद्रव्य X चे परमाणू वस्तुमान 16.2 u आहे. तर त्याच्या एका नमुन्यात समस्थानिक 8X16 आणि 8X18 यांची प्रत्येकी शेकडा प्रमाण किती असेल?
 

12. जर मूलद्रव्याचे Z=3 असेल तर मूलद्रव्याची संयुजा किती असेल? मूलद्रव्याचे नाव पण लिहा.

उत्तर - हा मूलद्रव्य लिथियम होय या मूलद्रव्याची संयुजा एक असेल (Z = 3)
13. दोन परमाणू प्रकारांच्या केंद्राचे संघटन खाली दिले आहे.

                      X        Y            
      प्रोटॉन   =  6       6
      न्यूट्रॉन  =  6       8


      X = C = 6C12

      Y = C = 6C14
X
आणि Y चे वस्तुमान अंक काढा. या दोन प्रकारात कोणता संबंध आहे?
14. खाली दिलेल्या वक्तव्यांना चूक असेल तर F आणि बरोबर असेल तर T लिहा.
(a) जे.जे. थॉमसनने असे प्रतिपादन केले होते की परमाणूच्या केंद्रात केवळ न्यूक्लिऑन्स असतात. = F
(b)
एक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मिळून न्यूट्रॉनची निर्मिती करतात म्हणून ते भाररहित असतात.= F
(c)
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या जवळ जवळ 1/2000 पट असते. = T
(d)
आयोडिनच्या समस्थानिकाचा उपयोग टिंक्चर आयोडीन तयार करण्यासाठी असतात. = T
सूचना : प्रश्न 15, 16 आणि 17 मधे बरोबरपर्याया समोर ( ) अशी आणि चुकीच्या पर्यायासमोर (û) अशी खूण करा.
15.
रुदरफोर्डचा अल्फा कणांच्या विचलनाचा प्रयोग कशाच्या शोधासाठी उपयुक्त ठरला.
(a) परमाणू केंद्र ( )
(b)
इलेक्ट्रॉन (û)
(c)
प्रोटॉन (û)
(d)
न्यूट्रॉन (û)
उत्तर - (a) परमाणू केंद्र

 
16. मूलद्रव्याच्या समस्थानिकाना हे असते.
(a) समान भौतिक गुणधर्म (û)
(b)
भिन्न रासायनिक गुणधर्म (û)
(c)
भिन्न न्यूट्रॉन संख्या ( )
(d)
भिन्न परमाणू अंक (û)
उत्तर - (c) भिन्न न्यूट्रॉन संख्या
17. CI- यनाच्या संयुजांची संख्या
(a) 16 (û)
(b) 8
( )
(c) 17
(û)
(d) 18
(û)
उत्तर - (b) 8
18. खालील पर्यायांपैकी कोणते सोडीयमच्या इलेक्ट्रॉनचे योग्य संरूपण आहे ?
(a) 2, 8 (û)
(b) 8, 2, 1
(û)
(c) 2, 1, 8
(û)
(d) 2, 8, 1
( )
उत्तर - (d) 2, 8, 1
19. खालील तक्ता पूर्ण करा


💠इयत्ता- 9वी💠

❇️प्रश्नोत्तरे❇️
🛑2.आपल्या सभोतालचे द्रव्य शुद्ध आहे का?🛑

🛑1.आपल्या सभोतालचे द्रव्य🛑
👇👇👇👇👇👇👇👇👇
➖➖🔷➖➖🔷➖➖🔷
👏शेअर करा👍

 

🛑इयत्ता - आठवी

🛑विषय - विज्ञान

🌀सत्र -1

📝प्रश्नोत्तरे📝

🌀3.कृत्रिम तंतू आणि प्लॅस्टिक👇👇👇👇👇

https://www.smartguruji.in/2021/08/krutrim-tantu-ani-plastic-8th-science.html

➖➖➖➖➖➖➖➖

🟣2.सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू

 https://www.smartguruji.in/2021/08/aathavi-vidnyaan-2-sukshmajeev mitra.html 


🎯1. पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन 

 https://www.smartguruji.in/2021/08/athavi-1-pikanche-utpadan.html

<
टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.