6th SS Textbook Solution 1.1 Bengaluru Devision 1.1 बेंगळुरू विभाग

आपले गौरवशाली राज्य कर्नाटक (1.1 बेंगळुरू विभाग)
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
6वी समाज विज्ञान 
प्रकरण 2 - आपले गौरवशाली राज्य कर्नाटक
(1.1 बेंगळुरू विभाग)
 

इयत्ता - सहावी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - 2022 सुधारित 
 
विषय - स्वाध्याय 

प्रकरण 2 - आपले गौरवशाली राज्य कर्नाटक
(1.1 बेंगळुरू विभाग)

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली तीन राजघराणे कोणती? 

उत्तर - होयसळ,विजयनगर, गंग , वडेयर ही प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली राजघराणी होय.

2) बेंगळूरु विभागात किती जिल्हे आहेत ?

उत्तर - बेंगळूरु विभागात 9 जिल्हे आहेत.

3) या विभागात राज्य केलेल्या दोन पाळेगारांची नावे लिहा.

उत्तर - केळदी, चित्रदूर्ग,यलहंका हे बेंगळुरू विभागात राज्य केलेले पाळेगार होते. 

4) नैसर्गिक स्रोत म्हणजे काय ? उदाहरणे द्या. 

उत्तर - नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या विविध बाबींना नैसर्गिक स्रोत असे म्हणतात. उदा. नद्या, अरण्ये, दऱ्या, धबधबे, खनिजे, जंगली प्राणी इत्यादी.

5) बेंगळूरू विभागातील सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा कोणता?

उत्तर - शिवमोग्गा हा बेंगळूरू विभागातील सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा आहे.

6) बेंगळूरू विभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासण्याची कारणे कोणती ? 

उत्तर - प्रदूषण,अरण्यनाश,शहरीकरण इत्यादी कारणामुळे आपल्या अनेक नद्या ओसाड पडत आहेत. भू अतिक्रमणामुळे अनेक जलाशय नाश्ता होत आहेत या कारणांमुळे बेंगळूरू विभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे.

7) बेंगळूरू विभागातील दोन धबधब्यांची नावे लिहा.

उत्तर -बेंगळूरू विभागातील दोन धबधब्यांची नावे खालीलप्रमाणे -

1.जोग धबधबा 

2.मुत्यालमडू

 

8) बन्नेरघट्ट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

उत्तर - बन्नेरघट्ट हे राष्ट्रीय उद्यान बेंगळुरू जिल्ह्यात आहे.

9) बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखराचे नाव लिहा.

उत्तर - हालूरामेश्वर हे बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखराचे नाव होय.

10) बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधामांची नावे सुचवा.

उत्तर - बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधामांची नावे - 

गुडवी पक्षीधाम-शिवमोग्गा जिल्हा 

कग्गलडू पक्षीधाम - तुमकुर जिल्हा 

मंडगद्दे पक्षीधाम - शिवमोग्गा जिल्हा

11) रामनगर जिल्ह्यातील पक्षीधामामध्ये कोणत्या पक्षांचे रक्षण केले जाते?

उत्तर - रामनगर जिल्ह्यातील पक्षीधामामध्ये गिधाड या पक्षाचे रक्षण केले जाते. 

12) बेंगळूरू विभागातील प्रमुख आहार पिके कोणती? 

उत्तर - नाचणा, मका , जोंधळा ,भात, वाटाणा, हरभरा इत्यादी ही बेंगळुरू विभागातील प्रमुख पिके होय.

13) तुतीची पाने ही कोणत्या उद्योगासाठी कच्चा माल ठरतात?

उत्तर - तुतीची पाने ही रेशीम उद्योगासाठी कच्चा माल ठरतात.

14) भद्रावती येथील पोलाद व लोखंडाच्या कारखान्यांची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

उत्तर - भद्रावती येथील पोलाद व लोखंडाच्या कारखान्यांची स्थापना 1923 साली करण्यात आली.

 

15) बेंगळूरू विभागातील कोणत्या ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहेत?

उत्तर - बेंगळूरू विभागातील  ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहेत.

16) बेंगळूरू विभागातील ज्ञानपीठ प्रशस्ती मिळविलेल्या तीन साहित्यिकांची नावे लिहा. 

उत्तर - कुवेंपू,मास्ती वेंकटेश अय्यंगार व यू. आर. अनंतमूर्ती 

17) प्रसिद्ध लोककला म्यूझियम 'जानपद लोक' याची स्थापना कोणी केली?

उत्तर -प्रसिद्ध लोककला म्यूझियम 'जानपद लोक' याची स्थापना एच.एल. नागेगोडा यांनी केली.

18) बेंगळूरू शहरात प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव कोणता? 

उत्तर - करग हा बेंगळूरू शहरात प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव होय.

19) भारतरत्न प्रशस्ती मिळविलेल्या बेंगळूरू विभागातील दोघांची नावे लिहा.

उत्तर -भारतरत्न प्रशस्ती मिळविलेल्या बेंगळूरू विभागातील दोघांची नावे - 

1.सर एम्. विश्वेश्वरय्या 

2. सी.एम. आर.राव 

20) मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ? नाव लिहा. 

उत्तर - के.सी. रेड्डी हे मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री होय.

21) कर्नाटक एकीकरण घडवून आणणाऱ्या दोन नेत्यांची नावे लिहा.

उत्तर - कर्नाटक एकीकरण घडवून आणनाऱ्या दोन नेत्यांची नावे -

1. केंगल हनुमंतय्या

2. एस. निजलिंगप्पा

 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.