LOCAL GOVT IMP QUESTIONS स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाचे प्रश्न

स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाचे प्रश्न
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

8वी मुल्यांकन परीक्षा सरावासाठी महत्वाचे प्रश्न 

इयत्ता - आठवी 

विषय - समाज विज्ञान 

घटक - स्थानिक स्वराज्य संस्था

 

 

1.भारत हे रामराज्य व्हावे अशी कोणाची इच्छा होती?

उत्तर - महात्मा गांधीजींची पंचायतराज पद्धतीच्या

2.इतिहासात कोणती घटना दुरुस्ती मैलाचा दगड बनली आहे?
उत्तर - 1993 ची 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती
3.पंचायत राज्य कायदा केव्हा अस्तित्वात आला?
उत्तर - 1983
4.पंचायत राज्य कायद्याची कार्यवाही केव्हा सुरू झाली?
उत्तर - 1985
5.ग्रामसभेचे आयोजन करावे असे केव्हापासून ठरविण्यात आले?
उत्तर - 1993 च्या घटनादुरुस्तीत
6.ग्रामसभेत कोणाकोणाला भाग घेता येतो?
उत्तर - वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीस ग्रामसभेत भाग घेता येतो.
7.ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर - सरपंच किंवा ग्रामपंचायत अध्यक्ष
8.किती महिन्यातून एकदा ग्रामसभेचे आयोजन केले जाते?

उत्तर - सहा महिन्यातून एकदा
9.कशाच्या प्रमाणावर ग्रामपंचायत आकार घेते?
उत्तर - लोकसंख्येच्या प्रमाणावर
10.कोणत्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन होते?
उत्तर - ज्या गावची लोकसंख्या 5000 ते 7000 च्या दरम्यान असते अशा ठिकाणी

 
11.ग्रामसभेच्या अध्यक्षांचा कालावधी किती असतो?
उत्तर - 30 महिने (अडीच वर्षे)
12.पंचायत विकास अधिकारी (PDO) ची नेमणूक कोणामार्फत केली जाते?
उत्तर - कर्नाटक राज्य लोकसेवा आयोग (KPSC)
13.स्थानिक स्वराज्य संस्थेत एखादा निर्णय घेण्यास किती सदस्य हजर असले पाहिजेत?
उत्तर - एक तृतीयांश सदस्य
14.कर्नाटकात किती ग्रामपंचायती आहेत?
उत्तर - कर्नाटकात 6022 ग्रामपंचायती आहेत.
15.कर्नाटकात किती तालुका पंचायती आहेत?
उत्तर - 176 तालुका पंचायती
16.कर्नाटकात किती जिल्हा पंचायती आहेत?
उत्तर - 30 जिल्हा पंचायती
17.किती लोकांसाठी एक तालुका पंचायत प्रतिनिधी निवडला जातो?
उत्तर - 12,000 ते 15,000
18.तालुका पंचायत अध्यक्षांचा कालावधी किती असतो?
उत्तर - 20 महिने
19.किती लोकसंख्येमागे एक जिल्हा पंचायत प्रतिनिधी निवडला जातो?
उत्तर - 40,000 लोकसंख्येमध्ये
20.विपत्तीच्या काळात संकट ग्रस्तांच्या मदतीसाठी किती रुपयांच्या मजुरीचा अधिकार जिल्हा पंचायत अध्यक्षांना असतो?
उत्तर - एक लाख रुपये मंजुरीचा अधिकार

 
21.नगराची लोकसंख्या किती असते 20000 ते 50,000 शहराची लोकसंख्या किती असते ?
उत्तर - 50,000 ते 3 लाख
22.नगरपरिषदेत किती सदस्य असतात?
उत्तर - नगर परिषदेत 23 ते 27 सदस्य असतात.
23.नगरपालिकेत किती सदस्य असतात?
उत्तर - 31 ते 37 सदस्य
24.कोणत्या कायद्यांतर्गत महानगरपालिकेची रचना केलेली असते?
उत्तर - 1976 कर्नाटक नगरपालिका संस्था कायदा

25.नगरपालिकेच्या सदस्याला काय म्हणतात?
उत्तर - नगरसेवक
26.नगरपालिकेच्या अध्यक्षाला काय म्हणतात?
उत्तर - नगराध्यक्ष
27.महापालिकेच्या सदस्याला काय म्हणतात?
उत्तर - कार्पोरेटर
28.महानगरपालिकेच्या अध्यक्षाला काय म्हणतात?
उत्तर - महापौर
29.महानगरपालिकेत सदस्यांची संख्या किती असते?
उत्तर - 30 पेक्षा जास्त व 100 पेक्षा कमी
30.कर्नाटकात किती महानगरपालिका आहेत?
उत्तर - कर्नाटकात 10 महानगरपालिका आहेत.

 1 टिप्पणी

  1. सैनिक स्वराज्य संस्था प्रश्न उत्तर

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.