TEACHER TRANSFER PROCESS & TIME TABLE 2022 REQUEST / MUTUAL TRANSFER

विनंती बदलीसाठी शिक्षकांनी पूर्ण केलेल्या नोकरी वर्षांच्या आधारे सेवा अंक खालील प्रमाणे निर्दिष्ट करण्यात येतील..
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 2022-23 या वर्षातील सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तसेच प्राथमिक शाळा शिक्षक आणि माध्यमिक शाळा सहाय्यक शिक्षक,समान श्रेणी शिक्षक वृंद तसेच सरकारी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व इतर अधिकारी यांची सामान्य बदली प्रक्रिया करणेबाबत..


कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदली नियमन] अधिनियम-2020 [कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04] आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 नुसार, बदलीचे वेळापत्रक आधीच प्रकाशित करण्यात आले होते.परंतु बदली कायदा आणि 2020 च्या नियमांमधील पैलूंमध्ये सुधारणा करून आणि संदर्भ-11 नुसार बदली कायद्याच्या नियमांमध्ये सुधारणा करून, शिक्षक अनुकूल बदली अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने 2022 मध्ये सुधारणा कायदा आणण्यात आला आहे.पार्श्‍वभूमीवर, सार्वजनिक शिक्षण विभागाच्या सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांसह प्राथमिक शाळा शिक्षक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षक/समान श्रेणी शिक्षक आणि सरकारी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक/समान श्रेणी अधिकारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांसह वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.
*सर्व बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल..Weighted Score प्रकाशित करणे, आक्षेप नोंदवणे, बदली अर्ज सादर करणे,अर्ज/प्राधान्य क्रम परिशीलन,अर्ज स्वीकारणे,नाकारणे, तात्कालिक पात्र / अपात्र यादी प्रकाशित करणे,आक्षेप नोंदवणे,अंतिम यादी, अंतिम यादीनुसार Counselling प्रक्रिया शिक्षण विभागाच्या पोर्टलमध्ये करणे..अशा पद्धतीने ही बदली प्रक्रिया असून ही प्रक्रिया पार पडण्यासाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल..

सामान्य विनंती बदली/परस्पर बदली  (GENERAL REQUEST TRANSFER/Mutual Transfer)

👉विनंती बदलीसाठी शिक्षकांनी पूर्ण केलेल्या नोकरी वर्षांच्या आधारे सेवा अंक खालील प्रमाणे निर्दिष्ट करण्यात येतील..

शिक्षक बदली उद्देशाने -

👉( C Zone मध्ये नोकरी वर्षांची संख्या x 3 गुण)
👉(B Zone मध्ये नोकरी वर्षांची संख्या x 2 गुण)
👉 (A Zone मध्ये नोकरी वर्षांची संख्या x 1 गुण)
(सलग तीन वर्षे एकाच शाळेत व एकाच पदावर नोकरी केल्यास नोकरी वर्षांची संख्या x 1)
टीप- सहा महिने (180 दिवस) तसेच त्यापेक्षा जास्त नोकरीचे एक वर्ष असे विचारात घेतले जाईल.तर 180 दिवसांपेक्षा कमी नोकरी असल्यास 0 वर्ष असे विचारात घेतले जाईल.

सेवा अंक निर्धारित करण्याचे उदाहरण -

👇👇👇👇👇👇👇वेळापत्रक

 

प्राथमिक शिक्षक

माध्यमिक शिक्षक

सामान्य बदलीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 

Within Unit/Out of Unit विनंती बदली व परस्पर बदली अर्ज (प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक

प्रस्तुत वर्षात अतिरिक्त शिक्षक Counselling मध्ये शाळा घेतलेल्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्यास संधी असेल.मागील वर्षी अतिरक्त शिक्षकांना अर्ज करण्यास संधी मिळणार नाही

02.01.2023

ते

25.01.2023

02.01.23

ते

25.01.23

दाखल्यांचे परिशीलन करणे.अर्ज स्वीकारणे / नाकारणे

06.01.2023 ते 27.01.2023

06.01.23

 ते 

27.01.23

विनंती बदली व परस्पर बदली अर्ज पात्र शिक्षकांची तात्कालिक यादी  

30.01.2023

30.01.23

वरील तात्कालिक यादीवर आक्षेप नोंदवणे

30.01.2023 ते 02.02.2023

30.01.23 

ते

02.02.23

वरीलप्रमाणे विनंती व परस्पर बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची अंतिम यादी आणि किमान 3 ते 5 वर्षे अवधी पूर्ण केलेल्या निर्दिष्ट व तांत्रिक सहाय्यकांचे संगणकीकृत Counselling ने स्थळ निवडण्यास अंतिम प्राधान्य यादी प्रकाशित करणे.

रिक्त जागा प्रकाशित करणे.

04.02.2023

04.02.23

अंतिम यादीनुसार बदली प्रक्रिया प्रारंभ –

प्राथमिक   - 06.02.2023

माध्यमिक 09.02.2023

 

अधिक माहितीसाठी कृपया खालील मार्गदर्शक नियम पाहावे ... 

 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


CLICK HERE FOR EXCESS TEACHER TRANSFER TIME TABLE & PROCESS - CLICK HERE 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.