दहावी समाज विज्ञान महत्वाचे प्रश्न 2. ब्रिटीश सत्तेचा विस्तार (SSLC SS IMP QUESTIONS AND ANSWERS )

सहाय्यक सैन्य पद्धती'दत्तक वारस नामंजूर
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 इयत्ता - दहावी 

विषय समाज विज्ञान 

 

 
. ब्रिटीश सत्तेचा विस्तार
प्र. . खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
. पहिले अँग्लो-मराठा युद्ध या कराराने थांबले ?
उत्तर : 'साल्बाईचा (सालण्याचा) करार
. 'सहाय्यक सैन्य पद्धती' यांने अंमलात आणली?
उत्तर : लॉर्ड वेलस्ली
. सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारणारा पहिला राजा कोण ?
उत्तर : हैद्राबादचा निजाम
. मराठ्यांचा शेवटचा पेशवा कोण ?
उत्तर : दुसरा बाजीराव पेशवा
. दत्तक वारसा नामंजूर (खालसा धोरण) कायदा कोणी केव्हा लागू केला ?
उत्तर : लॉर्ड डलहौसी. १८४८ मध्ये लागू केला.
. ब्रिटिशांच्या विस्तारासाठी सहाय्यक ठरलेल्या दोन पद्धती कोणत्या?
उत्तर : . सहाय्यक सैन्य पद्धत
. दत्तक वारस नामंजूर
. दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाचे मुख्य कारण काय?
उत्तर : मराठ्यांमधील अंतर्गत संघर्ष
. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने विलीन झाली?
उत्तर : . सातारा . नागपूर . संबलपूर . उदयपूर . जयपूर . झाशी .
 
प्र. . खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा
. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाची कारणे द्या.
उत्तर : . दुसऱ्या शाह आलमने कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत मराठ्यांना दिले.
.पेशवेपदासाठी मराठ्यांत आंतरिक वाद निर्माण झाला.
. राघोबा ब्रिटीशांच्या आश्रयाला गेला.
. या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घेतला पहिले अँग्लो मराठा युद्ध झाले.
. दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाचे वर्णन करा.
उत्तर : . मराठ्यांधील अंतर्गत संघर्ष हेच या युद्धाचे मूळ कारण ठरले.
. १८०२ मध्ये होळकारांनी शिंदे (सिंदिया) पेशव्यांचा पराभव केला.
. पेशव्यांनी वसईच्या तहाद्वारे सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारली.
. यामुळे पेशवे आणि मराठा साम्राज्याचे वैर वाढले.
. १८०३ ते १८०५ दरम्यान लॉर्ड वेलस्लीने अनेक मराठा घराण्यांचा पराभव केला.
. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारासाठी दत्तकवारसा नामंजूर कायदा कसा सहाय्यक ठरला ?
उत्तर - . १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीने : 'दत्तकवारसा नामंजूर' कायदा अंमलात आणला.
. यानुसार वारस नसलेल्या अनेक राजांना आपले राज्य गमवावे लागले.
. अनेक भारतीय राज्ये ब्रिटीश साम्राज्यात विलीन केली गेली.
. या कायद्यानुसार सातारा, नागपूर, संबलपूर, उदयपूर, जयपूर, झाशी राज्ये खालसा करण्यात आली.
प्र. . खालील प्रश्नांची पाच सहा वाक्यात उत्तरे लिहा
. तिसऱ्या अँग्लो- मराठा युद्धाचे वर्णन करा.
उत्तर : . स्वतःची पत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठा घराण्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
. १८१७ साली पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला चढविला.
. नागपूरच्या आप्पासाहेबांनी मल्हारराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.
. शेवटी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांने ब्रिटीशांविरुद्ध कोरेगांव अष्टी येथे १८१८ मध्ये युद्ध केले. . इंग्रजानी पेशवा हे पद रद्द करून बाजीरावला निवृत्तीवेतन दिले.
. अशारीतीने त्यांनी मराठ्यांचा विरोध पूर्णपणे दडपून टाकला आणि इंग्रजांचे साम्राज्य भारतभर पसरले.
 
. सहाय्यक सैन्यपद्धतीमधील अटी कोणत्या ?
उत्तर : . सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाऱ्या राज्यकर्त्यानी इंग्रजांची एक मोठी फौज आपल्या राज्यात ठेवून घेवून तिच्या खर्चाची तरतूद करावयाची.
. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी / संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत.
. राज्यकर्त्यांना इंग्रजांचा वकील आपल्या दरबारी ठेवावा लागे.
. इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियनांची नेमणूक करता येणार नाही.
. सर्व सेवांच्या बदल्यात त्या राज्यकर्त्याला ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण संरक्षण मिळेल.

ABC 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.