SC,ST,OBC,MINORITY SCHOLARSHIP CLOSED DURING YEAR 2022-23

सन २०२२-२३ पासून १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती...- केंद्र सरकार
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

सन २०२२-२३ पासून १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती...- केंद्र सरकार 

 

 

विषय: 2022-23 दरम्यान मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी-अर्जांची पडताळणी संबंधी.....

    शिक्षण हक्क कायदा (RTE) 2009 नुसार प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे सरकारला बंधनकारक आहे त्यानुसार सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालय व आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केवळ नववी आणि दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो.म्हणून 2022-23 या वर्षापासून केवळ ९वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे.

2. या संदर्भात राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (National Scholarship Portal) सूचना अपलोड केली गेली आहे.या व्यतिरिक्त,सर्व INOs/DNOs आणि SNOs ला SMS देखील पाठवले गेले आहेत. ज्यामध्ये शिष्यवृत्ती अर्जाच्या पडताळणी संबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

 
3.तसेच L-1 आणि L-2 स्तरावरील अर्ज पडताळणी करणार्‍या अधिकार्‍यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता IX आणि X च्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
   त्यामुळे सन 2022-23 पासून इयत्ता पहिली ते आठवीच्या SC,ST,ओबीसी,अल्पसंख्यांक प्रवर्गातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज केंद्र सरकारने फेटाळले आहेत.

 
शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत मोफत गणवेश पाठ्यपुस्तके,सायकल,शूज आणि शिष्यवृत्ती अशा अनेक सुविधा एससी,एसटी,इतर मागासवर्सगीय समुदायातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येत होत्या.पण यावर्षीपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती सुविधापासून वंचित रहावे लागणार आहे.

सविस्तर माहितीसाठी व अधिकृत आदेशासाठी खालील आदेश डाउनलोड करा..

 

 टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.