7th SS KALIKA CHETARIKE Learning Sheet 34,36(7वी समाज अध्ययन पत्रक 34,36) अध्ययन अंश 21- संविधानाची आवश्यकता

संविधानाची आवश्यकता समजून घेणे.
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

  

 

KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता - सातवी 

विषय- समाज  विज्ञान

 
  अध्ययन अंश 21 नागरिकशास्त्र
                                                               संविधानाची आवश्यकता
 

अध्ययन निष्पत्तीसंविधानाची आवश्यकता समजून घेणे.

  अध्ययन पत्रक 34
कृती 1: कथा वाचल्या त्यानंतर प्रश्नांची उत्तर देऊया. - 
कथावाचन
             एक छोटासा देश होतातेथील लोक स्वतःला योग्य वाटेल ते काम चूक किंवा बरोबर याचा विचार  करता करत होतेआपल्या स्वार्थासाठी इतरांवर हल्ले करणेत्यांच्या वस्तू हिसकावून घेणेआपण जगण्यासाठी त्यांचा खूनही करत असतकोणासाठीही कोणतेही नीतिनियम नव्हतेसबल हे दुर्बलांचे शोषण करत होतेदिवसेंदिवस या घटनांमुळे अशांतता वाढीस लागलीकोणीही समाधानाने जीवन जगू शकत नव्हतेतेथे अशांतता वाढत असलेने लोक एके दिवशी एकत्र येऊन यापुढे आपण असे  भांडता एकमेकाशी सहकार्याने वागूअसे ठरवून काही नियम बनवलेसर्वांनी या नियमांचे पालन करावेनियमांचे उल्लंघन झाल्यास त्याला प्रथम शिक्षा देण्याचा निर्णय केलायामुळे तेथील लोकांनी काय करावेकाय करू नयेआपण रहात असलेल्या प्रदेशाचे रक्षण कशा प्रकारे करावे यासारख्या विविध विषयावर नियम बनवून एका पुस्तकाच्या स्वरूपात संग्रहित केलेतेथे प्रशासनासाठी कायदे बनवण्यासाठीत्याच्या अंमलबजावणीसाठीते योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठीकाही संस्थांची रचना केलीयापुढे आपल्या देशातील कोणत्याही भागामध्ये कोणताही नियम बनवल्यास तो सर्व लोकांनी मिळून बनविलेल्या कायदे पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे अंमलात आणला जावाएखादेवेळी कायदे पुस्तकाविरुद्ध नियम बनविल्यास तो नियम रद्द होईल असे ठरविलेत्या वेळेपासून त्या देशातील नागरिक तेथील कायद्याचा सन्मान राखूनशांततेनेसमाधानानेसहकार्यानेनियमाने जीवन जगत आहेत.
 

1) 
सर्वांनी कथा वाचली का कथा कशी होती यावर तुमचे मत काय चर्चा करा.
उत्तर- होय मी कथा वाचली कथा खूप छान होती.एखाद्या प्रदेशातील लोकांना आनंदाने आणि शांततेने जगण्यासाठी कायदे आवश्यक आहेत हे या कथेत सांगण्यात आले आहे.
    जर मी या परिस्थितीत असतो,तर मी लोकांना काय चांगले आहेआणि काय वाईट आहे याची जाणीव करून देईन आणि कायद्यांचे पालन करण्यास सांगेन.

2) 
कथेमध्ये त्या देशातील लोकांनी नियम का तयार केले ?
उत्तर- कारण त्या देशातील लोक स्वतःला योग्य वाटेल ते काम चूक किंवा बरोबर याचा विचार  करता करत होतेआपल्या स्वार्थासाठी इतरांवर हल्ले करणेत्यांच्या वस्तू हिसकावून घेणेआपण जगण्यासाठी त्यांचा खूनही करत असतकोणासाठीही कोणतेही नीतिनियम नव्हते.म्हणून त्या देशातील लोकांनी नियम तयार केले.

3) 
त्यांनी नियम बनवून त्याची नोंद केली नसती तर काय झाले असते यावर तुमचे विचार लिहा.
उत्तर- त्यांनी नियम बनवून त्याची नोंद केली नसती तर अशांतता वाढून लोकांच्या मध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले असते
 
4) लोकांनी लिहिलेल्या कायद्याच्या संग्रह पुस्तकाला आपण काय म्हणू शकतो ?
उत्तर- लोकांनी लिहिलेल्या कायद्याच्या संग्रह पुस्तकाला आपण राज्यघटना असे म्हणू शकतो.अध्ययन निष्पत्ती: भारतीय राज्य घटनेच्या संविधान सभेबद्दल वाचा आणि जाणून घ्यातसेच त्यामधील कर्नाटकातील प्रमुख व्यक्तींचा परिचय करून घ्या.

अध्ययन पत्रक 35
कृती 1: संविधान रचना समिती मध्ये कार्य केलेल्या कर्नाटकातील प्रमुख व्यक्तींची छायाचित्रे खाली दिलेली आहेतत्यांच्या बद्दल माहिती संग्रहित करून समजावून घ्या.

अध्ययन निष्पत्तीतुम्ही प्रस्तावना आणि त्यातील मुख्य शब्दाचे सोप्या अर्थाने वर्णन कराल.

  अध्ययन पत्र 36
                                                                                              
1. कृतीआम्ही दररोज प्रार्थनेवेळी भारताची संविधान प्रस्तावना वाचत नाही का?तर त्यामधून तुम्ही काय शिकलात ते लिहा.
उत्तरदररोज प्रार्थना वेळी राज्यघटना(संविधानप्रस्तावना वाचल्यामुळे आपल्याला राज्यघटनेचा थोडक्यात परिचय समजतो.


2. 
संविधानाच्या प्रस्तावनेमधील तुम्हाला आवडलेले दोन अंश कोणते का ते लिहा.
उत्तर1.. गणराज्य
भारत हे गणराज्य आहे.येथील राज्य कारभार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून चालतो.
2.. 
स्वातंत्र्य
कारण यामुळे आपल्याला विचार,अभिव्यक्तीविश्वासश्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळते.
3. 
समानता
सर्वजण समान आहेतगरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव  मानता सर्वांनी एकतेने राहण्यास सांगितले आहे.
 
कृतीखाली भारतीय संविधानाची प्रस्तावना दिली आहेती वाचून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे  लिहा.

1. संविधानाच्या प्रस्तावनेमधील प्रमुख मुद्द्यांची यादी करा.
उत्तर

1.सार्वभौम
2.समाजवादी
3.धर्मनिरपेक्ष
4.लोकशाही
5.गणराज्य
6.न्याय
7.स्वातंत्र्य
8.समानता
9.बंधुता
10.एकता  एकात्मता

2. प्रस्तावना मध्ये दिलेल्या खालील शब्दांच्या बद्दल तुम्ही काय समजावून घेतला ?
१. स्वातंत्र्य
कारण यामुळे आपल्याला विचार,अभिव्यक्तीविश्वासश्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळते.
2. समानता
सर्वजण समान आहेतगरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव  मानता सर्वांनी एकतेने राहण्यास सांगितले आहे.
3. बंधुता - मैत्रीपूर्ण वातावरणात सर्वांनी राहावे.आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत अशी भावना ठेवणे

  

♻️ कलिका चेतरिके 2022♻️

🛑इयत्ता - सातवी🛑

विषय - समाज विज्ञान 

अध्ययनांश 13 ते 19

♻️🛑उत्तरे♻️🛑

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://smartningguru.blogspot.com/2022/11/7th-ss-learning-sheet-answers-7-kalika.html

 


 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.