बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव | 8th SS Textbook Solution Lesson 10 Badamiche Chalukya Ani Kanchiche Pallav (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 10 बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव )

आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 10 बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

   


 

इयत्ता - आठवी 

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

इतिहास 

प्रकरण 10. 

 बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव

स्वाध्याय

1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. पुलकेशीने महेंद्र वर्मा या पल्लव राजाचा पराभव केला.

2. कर्नाटक हे नाव बदामीचे चालुक्य या घराण्याने दिले.

3. हर पार्वतीय हे संस्कृत नाटक शिवभट्टारक ने लिहिले.

4. वातापिकोंड ही उपाधी पहिला नरसिंह वर्मा या पल्लव राजाला दिली गेली.

5. अर्जुनाची तपस्या ही कलाकृती महाबलीपुरम येथे आहे.

II. थोडक्यात उत्तरे लिहा.

6. दुसऱ्या पुलकेशीने साम्राज्य विस्तार कसा केला ?

उत्तर - राजा जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक होय. दुसरा पुलकेशी हा या घराण्यातील अत्यंत

बलाढ्य व शूर सम्राट होय.कदंब,गंग आणि आलूप यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यांनी आपल्या

साम्राज्याचा विस्तार केला.राजा महेंद्रवर्माने दुसऱ्या पुलकेशीचे वर्चस्व अमान्य केल्यामुळे तो पराभूत

झाला.जेव्हा हर्षाने नर्मदेपलीकडे येण्याचा प्रयत्न केला.तेव्हा त्याला पुलकेशीने रोखले या विजयामुळे

त्याला दक्षिणप्रथेश्वर आणि द्वीपकल्पाचा सम्राट या उपाद्या मिळाल्या.

7. चालुक्यांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.

उत्तर- चालुक्यांनी जवळजवळ 200 वर्ष राज्य केले. राजाचा राज्यकारभारात सक्रीय सहभाग

असे.साम्राज्याचे जिल्ह्यात विभाजन केले होते.त्याला 'विषय' म्हटले जात असे.त्याची देखरेख

विषयाधिपती करत असत.खेडे हा राज्य कारभाराचा सर्वात लहान घटक होता.

खेडे हा राज्यकारभाराचा सर्वात लहान घटक होय.ग्रामप्रमुख खेड्याची व्यवस्था आणि हिशेब ठेवत.

8. चालुक्य हे साहित्यप्रेमी होते.उदाहरणसहित विवरण करा.

उत्तर - बदामीच्या चालुक्यांनी साहित्याला उत्तेजन दिले त्यामुळे कन्नड आणि संस्कृत भाषेची वाढ

झाली.कन्नड ही त्यांची राज्यभाषा होती.बदामीच्या कप्पे आर्यभट्ट यांची त्रिपदी शैली काव्यरूपात

आढळून येते.रवीकीर्ती,विज्जीका,अकलंक हे या काळातील संस्कृत विद्वान होते.दुसऱ्या कुलकेशीच्या

सुनेने कवयित्री विज्जिकाने 'कौमुदी महोत्सव' लिहिले.शिवभट्टारकाने 'हर पार्वतीय' लिहिले.ही या

काळातील महत्त्वाची नाटके होती.

कप्पे आर्यभटाची कविता 9. कांचीवर राज्य केलेल्या पल्लव राजांची नावे लिहा.

उत्तर - कांचीवर खालील पल्लव राजांनी राज्य केले-

शिवस्कंदवर्मा  

महेंद्रवर्मा 

नरसिंहवर्मा 

अपराजित पल्लव

10. पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला कसे उत्तेजन दिले?

उत्तर - पल्लवांनी संस्कृत आणि तमिळ भाषेला प्रोत्साहन दिले.कांची हे साहित्याचे केंद्र होते.भारवी

(किरातार्जूनीय) आणि दंडी हे या काळातील कवी होते. राजा महेंद्रवर्माने स्वतः 'मत्तविलास प्रहसन' हे

सामाजिक नाटक आणि 'भागवद्ज्जुक' हा ग्रंथ लिहिला.पल्लवांनी सर्व धर्मांना उत्तेजन दिले.

    महाबलीपुरम येथील पंचरथ

वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.