VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -3 DAY - 17 (विद्याप्रवेश - दैनंदिन कृती)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

 

 

         विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम खेळता खेळता शिकया तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.

विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश - दैनंदिन कृती

आठवडा - 

दिवस -  17

   

तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

 

कृती 1  :

प्रत्येक मुलाला त्याच्या / तिच्या नावाने बोलवून “Good morning, welcome ”Have a Funfilled Friday” असे म्हणून मुलांचे स्वागत करा. ते  “Good morning, Thank you. Same to you” असा प्रतिसाद देतील. 

कृती 2  :

दिवस – 14 मध्ये उल्लेख केलेल्या शुभेच्छा देवाणघेवाण कृती पुन्हा करा.

गुजगोष्टी

कृती :  फरक शोधा

आवश्यक साहित्य : म्युजिक प्लेअर किंवा मोबाईल, विविध प्राण्यांचे फ्लॅशकार्ड

पद्धत: 1. मुलांना वर्तुळात उभे करा.

       2. त्यांच्या आवडत्या प्राण्याबद्दल बोलण्यासाठी प्रेरित करा. ( पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी ) या नमुन्याप्रमाणे शिक्षकांनी प्रारंभ करणे.

       3. बोलण्यासाठी प्रत्येक मुलाला संधी मिळेल याची खात्री करा.

       4. 2 री आणि 3 री च्या मुलांनी आवडत्या प्राण्याची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल बोलणे.

( सूचना : शिक्षक त्यांचे स्वतःचे प्रश्न विचारू शकतात आणि मुलांना त्यांच्या स्थानिक भाषेत बोलायला प्रोत्साहन देवू शकतात. )

·   Head, shoulders, knees and toes ही rhyme ( इंग्लीश गाणे ) अभिनयासहित मुलांसोबत म्हणणे. 

माझा वेळ (Free Indore play)

मुले त्यांना निर्दिष्ट केलेल्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करतात.

शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य : ध्वनी जागरूकता, स्मरणशक्ती आणि परिसराबदल जागरूकता  

कृती 2 : आवाज ऐकून ओळखा.       ( ध्येय 3 )  

उद्देश : आवाज ऐकून ओळखणे.

आवश्यक साहित्य : श्रवण यंत्र

पद्धत : मुलांना वेगवेगळ्या गटात बसायला सांगणे. प्रत्येक गटातील मुलांनी श्रवणयंत्राच्या सहाय्याने प्राण्याचा आवाज ऐकून, कोणता प्राणी आहे ते ओळखणे. प्रत्येक मुलाला संधी मिळेपर्यंत कृती पुढे चालू ठेवणे.

इयत्ता 2 री –

1. शिक्षकांनी प्राणी, पक्ष्याचा आवाज काढून, हा कोणत्या प्राणी / पक्ष्याचा आवाज आहे हे ओळखायला सांगणे.

2. नंतर मुलांना प्राणी आणि पक्ष्यांचा आवाज काढायला सांगणे.

इयत्ता 3 री –

1. प्राण्यांचा आवाज ओळखून प्राण्यांच्या नावांची यादी करणे.

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

( मुलांच्या कृती

सामर्थ्य : स्वतः आणि इतरांबद्दल जागरूकता,मौखिक भाषा विकास, शब्दभांडार अभिवृद्धि

 कृती 03 : अभिनय गीत / नाटक                   ( ध्येय – 1 ) 

   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

उद्देश : शारीरिक वाढ आणि विकासाची उत्क्रांती जाणवते.

·         शब्दभांडार वाढविण्यासाठी ताल, लय, संदर्भ आणि स्पष्ट उच्चार वाढवणे.

·         स्वतःचे सुप्तगुण ओळखणे.

आवश्यक साहित्य : बालगीताची प्रत

पद्धत : मुलांना वर्तुळाकारात उभे करणे. सुलभकारांनी मुलांना माहीत असलेले बालगीत गाण्यास प्रेरित करणे. बालगीत शरीराची हालचाल, हावभावासह म्हणणे. बालगीतातील लयबद्ध शब्द ऐकून त्यांचा आनंद घेण्यास प्रोत्साहन देणे.

टीप : 2 री आणि 3 री वर्गांसाठी अभिनय गीत म्हणून झाल्यानंतर प्रश्न विचारून उत्तर मिळविणे.

वापरायचे सराव पत्रक :  H. W. – 4             ( इयत्ता 1 ली, 2 री, 3 री )

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

 

 

 

 श्रवण   करणे   व  बोलणे

सामर्थ्य : लक्ष केंद्रित करणे आणि ऐकणे, अनुक्रमिक विचार, स्थूल स्नायू कौशल्य अभिवृद्धी  

कृती 19 :  ध्वनीतील फरक ओळखणे         ( ध्येय -2 )                       ECL-11

उद्देश :

v  वेगवेगळे शब्द ऐकून फरक ओळखणे.

v  शब्द क्रमाने सांगण्याचा सराव करणे.

v  ध्वनीशी संबंधित सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये विकसित करणे.

आवश्यक साहित्य : खडू, मार्कर, क्रेयांस, क्रमसंख्या लिहिलेला तक्ता

पद्धत : शिक्षक चार शब्द एकत्रितरीत्या सांगतील.त्यामधील तीन शब्द एकाच आरंभिक ध्वनीने सुरु होणारे असले पाहिजेत आणि शब्द वेगळ्या ध्वनीने सुरु होणारा असावा. उदा: कमळ, कर, काम, मकर यामधील भिन्न ध्वनी असलेला शब्द कोणता? असे विचारून ओळखायला सांगणे.

टीप : 2 री च्या मुलांना जोडाक्षरे असलेले शब्द देणे. 3 री च्या मुलांनी स्वतः शब्दांच्या गटाची रचना करून सांगणे.

आकलानासहित वाचन

सामर्थ्य : छापील मजकुराबदल जागृती, शब्द ओळखतात, अर्थग्रहण करतात, शब्दभांडार समृद्धी आणि परिसराबदल जागरूकता

कृती 18 :  

चित्र संचयिका ( ध्येय – 2 )  विषय : फक्त रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या वस्तू / गोष्टी

उद्देश:

·         चित्र वाचणे आणि चर्चा करून अर्थग्रहण करणे.

·         आनंद, मनोरंजन आणि इतर उद्देशांसाठी स्वतंत्रपणे वाचन करणे.

आवश्यक साहित्य : फक्त रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या वस्तू / गोष्टींना संबंधित चित्रे, त्यांना पूरक अशी गाणी/ गोष्टी/ कविता यांची यादी

पद्धत :

v  मुलांना माहीत असलेली गाणी आणि बालगीताना संबंधित चित्रे ओळखणे.

v  गाणे / गोष्टीमध्ये आलेल्या विशेष / वेगळे शब्द ओळखून त्यांना नावे देणे.

v   गाणे / गोष्टीमध्ये आलेली प्रमुख पात्रे ओळखणे आणि पुनरावर्तीत शब्द / ओळी सांगणे / लिहिणे.

v   नमुना चित्रे ( फक्त रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या वस्तू / गोष्टींना संबंधित ) वाचणे आणि त्यासाठी प्रतिसाद देत शिक्षकांशी चर्चा करतील.

व्यक्तिगत चित्र संचयिका : गोष्ट किंवा गाण्यामध्ये येणाऱ्या वस्तू किंवा विशेष शब्द , संदर्भित चित्रे वाचून अर्थग्रहण करून व्यक्तिगतरीत्या चर्चा करण्यास मुलांना अनुमती देणे. ती चित्रे वाचून अर्थग्रहण करून अभिव्यक्त होतात.

उदा : चंद्र, चांदण्या, पथदीप इत्यादी... चित्रे / व्हिडीओ

शिक्षकांनी मार्गदर्शन करताना वापरावयाचे प्रश्न:

·         फक्त रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या वस्तू / गोष्टी कोणत्या?

·         त्यातील तुला आवडणाऱ्या वस्तू कोणत्या?

अशाप्रकारे शिक्षक प्रश्नावली तयार करून वर्गाला अनुकूल होईल याची काळजी घेतात.

 फक्त रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या वस्तू / गोष्टींची चित्रे / व्हिडीओ / गाणी / गोष्टी वापरून अथवा दाखवून मुलांसोबत चर्चा करणे.

 सदर संदर्भासाठी शिक्षक मुलांना मुक्तपणे बोलायला, प्रश्न विचारायला आणि त्यांच्या सोप्या भाषेत चर्चा करण्याची संधी द्यावी.

शिक्षकांनी 2 री आणि 3 री च्या वर्गातील मुले, 1 ली च्या मुलांसोबत परस्पर चर्चा करण्यास सहकार्य करणे आणि विषय विस्तारितपणे चर्चा करताना सर्व मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळेल याची खात्री करणे. त्याबरोबरच 2 री आणि 3 री च्या मुलांनी त्यांच्या वयोमानाला अनुसरून विषय व्याप्तीवरील उन्नत विचार चर्चेमध्ये समाविष्ट होतील यासाठी संधी उपलब्ध करून देणे.

( सदर कृतीचा पुढील भाग 23 व्या दिवशी घ्यावयाचा आहे. )

उद्देशीत लेखन

सामर्थ्य : लेखन कौशल्याचा सराव, शब्दभांडाराची अभिवृद्धि, हात आणि डोळे यांची सुसंगतता, सृजनशीलता.   

कृती 34 :   ( ध्येय – 2 ) 

कृतीचे नाव : नोंदवही रचना                ECW-9

उद्देश :

·         मुलांची हस्तपुस्तिका तयार करणे.

·         मुलांच्या आवडत्या चित्रांचा संग्रह करून पुस्तक तयार करणे.

·         चित्रे काढणे आणि त्यांचा संग्रह करण्याची आवड निर्माण करणे.

आवश्यक साहित्य : पेपर, रंग, कार्डशीट पेपर

पद्धत : शिक्षकांनी वर्गाची नोंदवह्या तयार करण्यासाठी मुलांना मदत करणे. यामध्ये प्रत्येक मुलाला एका पेपरवर सुचविलेल्या विषयाबदल चित्र काढायला किंवा लिहायला सांगणे. नंतर तो पेपर वर्गाच्या नोंदवहीत ठेवण्यासाठी उपलब्ध करून देणे.  सर्व मुलांचे पेपर एकत्रित करून नोंदवही तयार करणे.

सुचविलेले विषय : माझा आवडता खेळ

टीप : 2 री आणि 3 री चे सर्व विद्यार्थी नोंदवही रचना करतील. ( 31 व्या दिवशी ही कृती पुढे चालू राहील )

मैदानी खेळ

कृती : सांगा सांगा किती? तुम्ही सांगाल तेवढे.  

सामर्थ्य : संख्या ज्ञान विकसित करणे.

साहित्य : नाही

पद्धत : मुलांनी वर्तुळाकारात राहून शिक्षकांनी सांगा सांगा किती असे म्हटल्यानंतर मुलांनी तुम्ही सांगाल तेवढे असं उत्तर द्यावे. नंतर शिक्षक सांगितलेल्या संख्येला अनुसरून मुलांनी गट करणे. संख्येला अनुसरून गट न करणाऱ्या मुलांनी खेळातून बाहेर जाणे.

2 री च्या मुलांना समसंख्या आणि 3 री च्या मुलांना विषम संख्या सांगत खेळ खेळणे.   

रंजक कथा

Ø  शीर्षक : सोनी & टोमॅटो

Ø  आवश्यक साहित्य : साहित्य, पात्रांची चित्रे

Ø  उद्देश :

Ø ऐकण्याचे कौशल्य वृद्धिंगत करणे.

Ø शब्दभांडार वृद्धिंगत करणे.

Ø कुतुहूल निर्माण करण्याचे कौशल्य विकसित करणे.

Ø अभिनय कौशल्य विकसित करणे.

Ø  पद्धत:

Ø गोष्ट वाचून पुनरावलोकन करणे.

Ø गोष्टीतील पात्रांची नावे मुलांन सांगायला लावून निरोप देणे.

Ø याच पद्धतीने लहान गोष्टी शिक्षकांनी सांगणे.

पुन्हा भेटू

·        दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·        दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.


 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.