NAVAVI MARATHI 3.POT (3.पोट)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

प्रश्नोत्तरे 


इयत्ता - नववी 

विषय - मराठी 

प्रकरण 3. पोट

लेखक - वि.स.खांडेकर 

मूल्य - जीवनवादी वृत्ती 

शब्दार्थ व टीपा

ठाम-दृढ
रंक -गरीब
कपी - वानर
वटपत्र- वडाचे पान
वट-वडाचे झाड
राव राजा -
पत्र -पान
खळगी -खड्डा
संभावना होणे - निंदा होणे
हालाहल-एक प्रकारचे भयंकर विष प्राशन करणे-पिणे
सयुक्तिक - योग्य
अर्धांगी - पत्नी
निर्वाणीचा - शेवटचा
आकांत करणे - ओरडणे
हुकमतीत राहणे -धाकात राहणे
हुकमत - धाक,
वेबंदपातशाही माजणे- अराजकता माजणे, गोंधळ माजणे
अनर्थ - संकट
आपत्ती - संकट
निखारा - विस्तव
नमूद करणे- लिहून ठेवणे
यावच्चंद्रदिवाकरौ - सूर्य चंद्र असे पर्यंत, कालातीत

 
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) जगातील सारे प्राणी यांच्या भजनी लागले आहेत.
(
अ) विठोबा


(
ब) संपत्ती


(
क) पोटोबा


(
ड) लक्ष्मी

 

उत्तर - (क) पोटोबा

(आ) प्रलयकाळी परमेश्वराचे स्वरूप कसे असते ?
(
अ) विराट

(
ब) भयंकर

(
क) वटपत्रावर निजण्या इतके लहान

(
ड) रौद्र

 

उत्तर -  (क) वटपत्रावर निजण्या इतके लहान

(इ) 'एकादशी' ..............
(
अ) उपाशी रहाशी

(
ब) भजन करशी

(
क) देवाला जाशी

(
ड) दुप्पट खाशी

उत्तर - (ड) दुप्पट खाशी
(ई) देवांना संजीवनी विद्येचा उपयोग झाला नसता सारे जग कशाने भरून गेले असते?
(
अ) सोन्याने

(
ब) राक्षसांनी

(
क) माणसांनी

(
ड) प्राण्यांनी

उत्तर - (ब) राक्षसांनी

 

प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(
अ) माणसाला रोज पोटाची आठवण केव्हा होते?

उत्तर - माणसाला दररोज पोटोबाची आठवण सकाळी 11:00 पूर्वीच होते.
(आ) विश्वाला व्यापूनही उरणारे खरे स्वरूप कोणाचे असते?

उत्तर - विश्वाला व्यापून उरणारे खरे स्वरूप परमेश्वराचे आहे.
(इ) पोटेश्वराची संभावना कोणत्या शब्दात केली जाते?
उत्तर - पोटेश्वराची संभावना वीतभर पोटाची खळगी भरणे अशा शूद्र शब्दांनी केली जाते.
(ई) मनुष्याच्या शरीराचा अतिशय नाजूक भाग कोणता?
उत्तर - मनुष्याच्या शरीराचा पोट हा हृदयापेक्षाही अत्यंत नाजूक असा भाग आहे.

 (उ) कवी लोक वेडे आहेत असे लेखक का म्हणतो?

उत्तर - कारण त्यांनी पोटावर एक ही काव्य रचलेले नाही म्हणून कवी लोक वेडे आहेत असे कवी म्हणतो.

 

प्र. 3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(
अ) पोट नसते तर आणखी कोणते मोठे अनर्थ ओढवले असते ?
उत्तर -  पोट नसते तर शाळा वाढविण्याऐवजी बंद करण्याचे ठराव पास झाले असते.डॉक्टरांना काम राहिले नसते.कुटुंबात दाणादाण उडवून नवऱ्यांनी नोकऱ्यांना व बायकांनी नवर्‍याला सोडचिट्ठी दिल्या नसत्या.कुटुंबात व समाजात अराजकता माजली असती व सर्वत्र मोठा अनर्थ म्हणजे प्रत्येक गावात कवी मंडळी उत्पन्न होऊन त्याची परस्परात युद्ध होऊन दुष्काळात मरणार्‍या माणसाऐवजी कवितांनी गुदमरुन जाणाऱ्या माणसांचे देखावे दिसले असते.

(आ) लोकांनी पोटाच्या बाबतीत कोणती गोष्ट लक्षात ठेवावी असे लेखकाला वाटते?

उत्तर -  लोकांनी एवढे लक्षात ठेवावे की शस्त्रक्रियेसाठी पोट फाडले तरी ते मरत नाही.पोट जाळण्यासाठी कुणी स्वाभिमान यावर निखारा ठेवला तरी त्याची राख होत नाही.उजाडले हे दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे सूर्य त्याचप्रमाणे मध्यान्ह काल दाखवण्यासाठी ते (पोट) नेहमी राहणारच.

(इ) पोटाचे जगावर कोणते उपकार झाले आहेत ?
उत्तर - पोट नसते तर कशाला मध्यातून शुक्राचार्यांच्या पोटात जाता आले नसते.देवांना संजीवनी विद्येचा उपयोग झाला नसता व सारे जग राक्षसांनी भरून गेले असते.पोटाचे जगावर हे केवढे मोठे उपकार झाले आहेत.

प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(
अ) 'पण त्याचे खरे स्वरूप विश्वव्यापूनही उरतो. पोटाचेही तसेच आहे.'
संदर्भ - हे विधान वि.स.खांडेकर यांच्या वायूलहरी या निबंध संग्रहातील पोट लघु निबंधाच्या पाठातील आहे.
स्पष्टीकरण - लेखकाने पोटाचे खरे स्वरूप दाखविण्यासाठी परमेश्वराचा दाखला दिला आहे.आपण त्या विश्वनिर्मात्या परमेश्वराला त्याचे स्वरूप हे विश्व व्यापून उरल्याचे म्हणतो.त्याचप्रमाणे हे पोटदेखील त्या परमेश्वरा इतकेच अधिक श्रेष्ठ आहे असे वरील विधानातून म्हटले आहे.

 

(आ) 'पण पोट मात्र कुणालाही सोडता येत नाही.'
संदर्भ - हे विधान वि.स.खांडेकर यांच्या वायूलहरी या निबंध संग्रहातील पोट लघु निबंधाच्या पाठातील आहे.

स्पष्टीकरण - पोटाचे अस्तित्व अमान्य करणारा महात्मा अद्याप झाला नाही व पुढे होणे ही शक्य नाही.अर्धांगीला टाकून देणाऱ्या मनुष्यालाही आपले पोट टाकून देता येत नाही.संन्यासी संसार,भिकारी लाज गर्भ श्रीमंतांची पोरे शाळा व देशभक्त भीती सहज सोडून देतात.हे सांगण्यासाठी लेखकाने वरील विधान म्हटले आहे.

(इ) 'पोटा, थोर तुझे उपकार' म्हणून मी गाऊही लागलो.'
संदर्भ - हे विधान वि.स.खांडेकर यांच्या वायूलहरी या निबंध संग्रहातील पोट लघु निबंधाच्या पाठातील आहे.
स्पष्टीकरण - जेव्हा वि स खांडेकर यांना शाळेला जावयाचे नव्हते तेव्हा ते पावसाला विनंती करतात देवघरातल्या देवाला गाऱ्हाने घालतात पण देवही कंट्रोलच्या वेळच्या अधिकाऱ्यांप्रमाणे थोड्याशा रकमेवर खुश होईना. आता काय करावे हा प्रश्न पुढे असताना त्याचे पोट त्याच्या मदतीला धावून आले.पोट दुखू लागले व पोटाने त्याचे दुःख साधून दिले.त्या आनंदाच्या भरात लेखकाने वरील उद्गार काढले आहेत.

प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
अ) पोट परमेश्वर आहे हे लेखकाने कसे सिद्ध केले आहे?

उत्तर -  पोट हे परमेश्वर आहे हे सांगताना परमेश्वराचा अंश प्रत्येक प्राण्यात असल्याचे आपण जसे मानतो तसे प्रत्येक प्राण्याला पोट असल्याचे लेखक स्पष्ट करतो.मग तो माणूस वा प्राणी कितीही मोठा किंवा लहान असो त्याला पोट आहे. परमेश्वराचा अंत लागत नाही तसाच या पोटाचा अंतही लागत नसल्याचे तो सांगतो.प्रलय काळात वडाच्या पानावर झोपण्या इतका लहान परमेश्वर विश्वव्यापीही आहे.तसे हे पोटी आहे.या पोटाची खळगी भरतच नाही.ज्याप्रमाणे परमेश्वराला फळ,फूल,पाणी भक्तीने दिलेले आवडते तसेच पोटालाही चहा,दूध,दारू,विष,पैसा काहीही देता येते व पोट ते पचवते.जसे परमेश्वराने हलाहल पचविले ते साक्षीदाराप्रमाणे पाठीला चिकटून न्यायाधीशापुढे हजर असते.म्हणून पोट हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे असे लेखक म्हणतो व पोट परमेश्वरच असल्याचे सिद्ध करतो.

 

आ) पोट नसते तर कुटुंबावर त्याचा कसा परिणाम झाला असता?
उत्तर - पोट नसते तर कुटुंबातून दाणादाण उडाली असती नवऱ्यानी नोकऱ्यांना व बायकांनी नवऱ्यांना सोडचिठ्या दिल्याची दृश्ये पहावयास मिळाली असती.घरातील चूल नेहमी थंड असल्यामुळे कमी झालेली उष्णता परस्परांवर धुमसणाऱ्या आप्तेष्टांना भरून काढावी लागली असती. मुलांनी नोकरी लागेपर्यंत आणि मुलींनी लग्न होईपर्यंत आई-बाबांच्या हुकूमतीत राहण्याची आवश्यकताच उरली नसती.सारांश,एखाद्या राज्यात ज्याप्रमाणे अराजकता माजली असती.जगाचा गाडा सुरळीत चालला नसता.धर्म कायदे सुरक्षित ठेवण्याची मोठे काम पोटांनीच केले आहे तेच राहिले नसते.

(इ) पोट नसते तर शाळा,रोगी, वकील, आचारी व खाणावळी यावर कोणता परिणाम झाला असता ?
उत्तर - पोट नसते तर शाळा वाढवण्याऐवजी बंद झाल्या असत्या.तसेच ठराव पास झाले असते.रोगी मरायला टेकला तरी डॉक्टर पत्त्याच्या बिझिकच्या खेळातील राजा-राण्यांची लग्न लावण्यात दंग झाले असते.पोटाचा पाश नसल्याने वकिलांनी अशिलाला धरण्याची धडपड मुळीच केली नसती.अशा या पोटाच्या अभावी खानावळी,उपहारगृहे, आचारी हे सर्व नामशेष झाले असते,मरून गेले असते.असा विपरीत परिणाम पोट नसते तर या सर्वांवर झाला असता.

प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(
अ) पोट परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे यासाठी लेखकाने सांगितलेल्या स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करा.
उत्तर - पोट परमेश्वर आहे असे म्हणण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे म्हणणेच योग्य ठरेल.परमेश्वराला पत्र,पुष्प,पाणी काहीही चालते.त्याचप्रमाणे पोटालाही चहा,दूध,दारू,विष काहीही चालते.पैसा म्हणजे विष आहे असे म्हणतात.पण या विषयाची पिंपेच्या पिंपे पिऊन टाकून हलाहल प्राशन करणाऱ्या शंकराला लाजवणारे पोट न्यायाधीशाच्या साक्षीदाराच्या किंबहुना प्रसंगी कारकुनाच्या शरीराला देखील कधी कधी चिकटलेले आढळून येते.

(आ) पोट परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यास कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर - पोट परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी आधी पोटोबा चे नाव घेतले जाते आणि त्यानंतर पंढरीच्या विठोबाचे नाव घेतले जाते.परमेश्वर फळ,पान,फूल किंवा भक्तीने दिलेल्या पाण्यावर ही संतुष्ट होतो.पण पोटाला रोज चहा,दूध,दारू व प्रसंगी विष देऊनही पुरत नाही.म्हणजेच शिवशंकरालाही लाजवणारे हे पोट आहे अशा अनेक उदाहरणांनी पोट हे परमेश्वरापेक्षा मोठे असल्याचे दाखवले आहे आणि पोटाला ते पोटेश्वर अशा शब्दाने मोठेपण देतात.

भाषाभ्यास -

अ) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा..
संभावना होणे - निंदा होणे
मयुरीने एका गोष्टीवरून मैत्रिणीची संभावना केली.

खळगी- खड्डा
अनिकेत शाळेला जाताना खळगीत पडला.

प्राशन करणे - पिणे
यमुनाने औषध प्राशन केले.

ठाम - दृढ
परमेश्वरापेक्षा मोठी आहे असे सृष्टी ठामपणे सांगते.

आकांत करणे - ओरडणे
भला मोठा साप पाहून मुलांनी आकांत केला.

हुकूमतीत राहणे - धाकात राहणे
मी आई-बाबांच्या धाकात राहते.

नमूद करणे - लिहून ठेवणे
दुकानदार उदारी नमूद करून ठेवतो.

 

(आ) समानार्थी शब्द लिहा.
राव – राजा श्रीमंत
रंक – गरीब, दरिद्री
पत्र – पान
पुष्प – फूल , सुमन
पाणी – जल
दूध – क्षीर
दया – कणव
लहानपण – बालपण

(
इ)विरुद्धार्थी शब्द लिहा.
अंत – प्रारंभ  
आठवणे – विसरणे
श्रेष्ठ – कनिष्ठ
अमान्य – मान्य
देव – दानव 

२ टिप्पण्या

  1. The fundamental unit of life
  2. Kahitari chukiche ahe
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.