9th Science 2.Aplya Sabhovatalache Dravy Shuddha Ahe Ka (2.आपल्या सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे का?)

मिश्रणात एका पेक्षा अधिक पदार्थ
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

इयत्ता - नववी 

विषय - विज्ञान 

 2.आपल्या सभोवतालचे द्रव्य शुद्ध आहे का?

 

तुम्ही काय शिकलात

👉मिश्रणात एका पेक्षा अधिक पदार्थ (मूलद्रव्य आणि/किंवा संयुग)

👉विभक्तिकरणाच्या योग्य तंत्रांचा उपयोग करून मिश्रणे शुद्ध पदार्थांत विभक्त करू शकतो.

👉द्रावण हे दोन किंवा अधिक पदार्थांचे समांग मिश्रण आहे. द्रावणातील प्रमुख द्रावक म्हणतात तर दुय्यम घटकाला द्राव्य म्हणतात.

👉द्रावणाची तीव्रता (संहती) द्रावणाच्या प्रति एकक घनफळ किंवा एकक वस्तुमानात असणारे द्राव्य होय ? 

👉जे पदार्थ द्रावकात अविद्राव्य असून ज्यांचे कण डोळ्यांना दिसतात त्याना निलंबन म्हणतात. निलंबन हे विषमांग मिश्रण आहे.
👉कलिल हे विषमांग मिश्रण असून त्यांच्या कणांचा आकार इतका सूक्ष्म असतों की ते डोळ्यांना दिसत नाहीत पण प्रकाशाचे अपस्करण करण्या इतपत मोठे असतात. ते दैनंदिन जीवनात व कारखान्यात उपयुक्त असतात. कणांना विखूरलेली अवस्था आणि ज्या माध्यमात ते विखूरलेले असतात त्याला विखूरण माध्यम म्हणतात.
ज्या माध्यमात ते विखूरलेले असतात त्याला विखूरण माध्यम म्हणतात.

👉शुद्ध पदार्थ मूलद्रव्य किंवा संयुग असू शकते. मूलद्रव्य म्हणजे असे द्रव्य ज्याचे रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही. दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांच्या विशिष्ठ वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग म्हणतात.

👉संयुगाचे गुणधर्म हे त्याच्या घटकांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. तर मिश्रण आपल्यातील मिश्रित मूलद्रव्यांचे किंवा संयुगांचे गुणधर्म दर्शवितात.

प्रश्न :
1. पदार्थ म्हणजे काय ?

उत्तर - द्रव्याचे एकुलते एक शुद्ध स्वरूप म्हणजे पदार्थ होय.

2. उदाहरणासह समांगी आणि विषमांग मिश्रणातील फरक सांगा.

मांगी मिश्रण

विषमांगी मिश्रण

ज्या मिश्रणातील घटक एकसारखे असतातते साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यास समांगी असे म्हणतात.

ज्या मिश्रणातील घटक भिन्न असतात व ते साध्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो त्यास विषमांगी असे म्हणतात.

हे रासायनिक पद्धतीने वेगळे करता येतात.

हे भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात.

उदा. पाणी व साखरेचे मिश्रण धातूंचे मिश्रण.

उदा. तेल व पाणी यांचे मिश्रण
खडू आणि पाणी यांचे मिश्रण.

 

3. कलिल,द्रावण आणि निलंबन हे एकमेकापासून कसे वेगळे आहेत ?

कलिल

द्रावण

निलंबन

हे विषमांगी मिश्रण आहे.

हे समांगी मिश्रण आहे.

हे विषमांगी मिश्रण आहे.

यातील कण लहान असतात.

यातील कण लहान असतात.

यातील कण मोठे असतात.

यातील कण साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

यातील कण साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

हे कण साध्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसतात.

यामध्ये प्रकाशाचे अपस्करण घडते.

यामध्ये प्रकाशाचे अपस्करण दिसत नाही.

यामध्ये प्रकाशाचे अपस्करण दिसते.


4. 298 K तापमानाला 100g पाण्यात 36g मीठ विरघळवून संपृक्त द्रावण बनविले असल्यास या तापमानाला त्याची संहती काढा.
उत्तर - द्रावक = पाणी = 100g.
द्राव्य = मीठ = 36g.
द्रावण = द्राव्य + द्रावक
= 36 + 100
= 136g.
   5.जेव्हा मिश्रण तापवणे सुरु करता तेव्हा तुम्हाला काय आढळते?


उत्तर - जेव्हा मिश्रण तापविणे सुरू करतो तेव्हा पदार्थाची वाफ होताना दिसते.

6.कोणत्या तापमानाला कांही काळ तापमानांक स्थिर राहतो?


उत्तर - उत्कलन बिंदूस तापमानांक स्थिर राहते.


7.अॅसिटोनचा उत्कलनांक किती?


उत्तर - अॅसिटोनचा उत्कलनांक 56 °C आहे.


8.दोन्ही घटक का विभक्त होतात?


उत्तर - उत्कलन बिंदू भिन्न भिन्न असतो तेव्हा दोन्ही घटक विभक्त होतात.

9. केरोसिन व पेट्रोलच्या मिश्रणाचे घटक कसे विभक्त कराल? (त्यांच्या उत्कलन बिंदुत 25°c पेक्षा अधिक फरक आहे) ही दोन्ही एकमेकात मिश्रीत होतात.

उत्तर -  भागश: उर्ध्वपातन पद्धतीने केरोसीन व पेट्रोलच्या मशीनचे घटक विभक्त करता येतात.


10. खालील उदाहरणात विभागीकरणाच्या तंत्राचे नाव लिहा.


1. दह्यापासून लोणी - सेंट्रीफ्युगेशन


2.
समुद्राच्या पाण्या पासून मीठ - स्फटिकिभवन


3.
मिठापासून कापूर - संप्लवन


11. स्फटिकीभवनाच्या तंत्राने कोणत्या प्रकारची मिश्रणे विभक्त करता येतात?


उत्तर -   स्फटिकीभवनाच्या तंत्राने खालील प्रकारची मिश्रणे विभक्त करता येतात.
  1) समुद्री पाण्यापासून मिळणाऱ्या मिठाचे शुद्धीकरण.
 2) अशुद्ध तुरटीपासून शुद्ध तुरटीचे स्फटिक मिळवणे.


8.खालील उदाहरणांचे भौतिक बदल किंवा रासायनिक बदलात वर्गीकरण करा.
उत्तर –

भौतिक बदल

रासायनिक बदल

झाडांना तोडणे.

लोखंडी कपाटाला गंज लागणे.

लोणी भांड्यात विरघळणे.

पाण्यातून विद्युत प्रवाह वाहून त्याचे ऑक्सिजन आणि हैड्रोजन वायू यात विघटन होणे.

पाणी उकळून वाफ बनणे

पाण्यात मीठ विरघळणे.

कच्च्या फळांपासून फ्रुट सॅलड बनविणे.

लाकूड आणि कागद जळणे.

स्वाध्याय
1. खाली दिलेल्या उदाहरणातील घटक विभक्त करण्यासाठी विभक्तीकरणाच्या कोणत्या तंत्रांचा अवलंब कराल ?


(a) सोडियम क्लोराइड त्याच्या पाण्यातील द्रावणातून - बाष्पीभवन


(b)
सोडियम क्लोराइड व अमोनियम क्लोराइड यांच्या मिश्रणातून सोडियम क्लोराइड - संप्लवन


(c)
मोटार कारच्या एंजिन ऑइल मधून धातूचे बारीक तुकडे. - गाळण


(d)
फुलांच्या पाकळ्यांच्या अर्कामधून विविध रंगद्रव्ये (pigments) - क्रोमॅटोग्राफी


(e) दह्यातून लोणी. - सेंट्रीफ्युगेशन


(f)
पाण्यातून तेल - विलगकारी नरसाळे


(g) चहातून चहाची पूड - गाळण


(h) वाळूतून लोखंडी टाचण्या - चुंबकीय


(i)
टरफलातून गव्हाचे दाणे - चाळण


(i)
पाण्यात निलंबनात असणारे मातीचे कण - गाळण


2. चहा बनवण्याच्या कृतीच्या पायऱ्या लिहा. द्रावण, द्रावक, द्राव्य, विरघळणे, विद्राव्य, अविद्राव्य, गलित द्राव, अवषेश हे शब्द वापरा.

उत्तर - गॅस पेटवून त्यावर एक पात्र ठेवा.त्या पात्रामध्ये द्रावक घाला.त्यानंतर त्यात द्रावकात द्रव्य (साखर,चहापूड)घाला दावकांमध्ये द्राव्य विरघळेल.साखरेची विद्राव्यता दिसते. द्रावक आणि द्रव्य गलित द्राव तयार होते गलित द्रावांमधील अवशेष करण्यामध्ये दिसते व द्रावण तयार होते.


3. प्रज्ञाने वेगवेगळ्या तीन पदार्थांची विद्राव्यता वि तापमानाला तपासून प्राप्त परीणाम खालील तालिकेत मांडले आहेत. (तालिकेत नमूद केलेला परीणाम 100 gm पाण्यात विरघळून संपृक्त द्रावण बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थाचे वजन ग्रॅम मध्ये दिलेले आहेत.) 


विरघळलेला पदार्थ

केलविन मध्ये तापमान

 

283

293

313

333

353

 

विद्राव्यता

पोटॅशियम नायट्रेट

21

32

62

106

107

सोडियम क्लोराइड

36

36

36

37

37

पोटॅशियम क्लोराईड

35

35

40

46

54

अमोनियम क्लोराईड

24

37

41

55

56


(a) 313 K तापमानाला 50 ग्रॅम पाण्यातील पोटॅशियम नैट्रेटचे संपृक्त द्रावण तयार करण्यासाठी लागणाऱ्या पोटॅशियम नैट्रेटचे वस्तुमान किती ?

उत्तर –     वरील तक्त्यानुसार 313K तापमानाला 100ml पाण्यात 62 gm. KNO3 विरघळते.तर प्रज्ञाकडे 50 पाणी आहे म्हणून KNO3 चे वस्तुमान 31 gm. असेल.

100 ml 62 gm.

50 ml 31 gm.

(b) प्रज्ञा पोटॅशियम क्लोराइडचे पाण्यातील संपृक्त द्रावण 353 K तापमानाला तयार करते आणि द्रावण थंड होण्यासाठी खोलीच्या तापमानाला ठेवते. द्रावण थंड झाल्यानंतर तिला काय आढळेल? स्पष्टीकरण करा.

उत्तर - 353K तापमानाला KCl 54ग्रॅम वस्तुमान पूर्णपणे विद्रावता दर्शवते.पण प्रज्ञांने पाण्यातील संपृक्त द्रावण तयार केले आहे.त्यामुळे द्रावण थंड झाल्यानंतर काचेच्या पात्रात KCl कण प्रज्ञाला स्पष्ट दिसतात.


(c) 293 K ला प्रत्येक लवणाची विद्राव्यता काढा. या तापमानाला कोणत्या लवणाची विद्राव्यता सर्वाधिक आहे?


उत्तर -KNO3         32 gm.

            NaCl         36 gm.
            KCl         35 gm.
            NHCl         37 gm.
अमोनियम क्लोराइडची द्रव्य राशी जास्त असल्याने विद्राव्यता सर्वाधिक आहे.


(d) तापमानातील बदलाचा लवणाच्या विद्राव्यतेवर कोणता परीणाम होतो?


उत्तर -  तापमानात वाढ झाल्यास लवणाच्या विद्राव्यतेवर परिणाम होतो.तापमानात वाढ झाली तर विद्राव्यता वाढते.


4. खाली दिलेल्या संज्ञाचे उदाहरणासह स्पष्टीकरण द्या.


(a) संपृक्त द्रावण -
उत्तर -दिलेल्या तापमानाला द्रावणात एक मर्यादेपलीकडे अधिक द्राव्य विरघळणे अशक्य होते.त्या द्रावणाला संपृप्त द्रावण असे म्हणतात.


(b) शुद्ध पदार्थ -
उत्तर -ज्या पदार्थात एकसारखे कण असून ते समान रासायनिक गुणधर्म दर्शवितात त्यास शुद्ध पदार्थ असे म्हणतात.


(c) कलिल -
उत्तर -ज्याचे द्रावण कण सर्वत्र विकलेले असून मिश्रण समान दिसते पण प्रत्यक्षात ते मिश्रण विश्रामंगी असते.त्यास कलिल द्रावण असे म्हणतात.


(d) निलंबन -
उत्तर -निलंबन हे विषमांगी द्रावण असून घनपदार्थ द्रवात न विरकरता संपूर्ण माध्यमात निलंबित राहतात.


5. समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण यात वर्गीकरण करा.

उत्तर - सोडा वॉटर, लाकूड, हवा, विनेगर (सिरका), गाळलेला चहा

समांगी मिश्रण

सोडा वॉटर,विनेगर (सिरका), गाळलेला चहा

विषमांगी मिश्रण

लाकूड, हवा

6. तुम्हाला दिलेला रंगहीन द्रव शुद्ध पाणी आहे याची कशी खात्री कराल?


उत्तर - पाण्याच्या उत्कलन बिंदूवरून आपण तो पदार्थ शुद्ध पाणी आहे याची खात्री करू शकतो.


7. खालील पैकी कोणते पदार्थ शुद्ध पदार्थाच्या श्रेणीत येतात?
(a) बर्फ
(b)
दूध
(c)
लोखंड
(d)
हैड्रोक्लोरिक आम्ल
(e)
कॅल्शियम ऑक्साइड
(f)
पारा
(g)
वीट
(h)
लाकूड
(i)
हवा

उत्तर – बर्फ,लोखंड,हैड्रोक्लोरिक आम्ल,कॅल्शियम ऑक्साइड,पारा हे पदार्थ शुद्ध पदार्थाच्या श्रेणीत येतात


8. खालील मिश्रणातून द्रावणे ओळखा.
(a) माती
(b)
समुद्राचे पाणी
(c)
हवा
(d)
कोळसा
(e)
सोडा वॉटर


उत्तर –  समुद्राचे पाणी, सोडा वॉटर ही द्रावणाची उदाहरणे आहेत.

9. खालील पैकी कोण टिंडाल परिणाम दाखवेल ?
(a)
मिठाचे द्रावण
(b)
दूध
(c)
कॉपर सल्फेटचे द्रावण
(d)
स्टार्चचे द्रावण


उत्तर – दूध, स्टार्चचे द्रावण


10. मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण यात वर्गीकरण करा
(a)
सोडियम
(b)
माती
(c)
साखरेचे द्रावण
(d)
चांदी
(e)
कॅल्शियम कार्बोनेट
(
f) कथील
(g)
सिलिकॉन
(h)
कोळसा
(i)
हवा
(
j) साबण
(k)
मिथेन
(l)
कार्बन डाय ऑक्साइड
(m)
रक्त


उत्तर –

मूलद्रव्य

सोडियम,चांदी,कथील,सिलिकॉन

 

संयुगे

कॅल्शियम कार्बोनेट,साबण

मिथेन,कार्बन डाय ऑक्साइड

मिश्रण

माती,साखरेचे द्रावण

कोळसा,हवा,रक्त

11. खालील पैकी रासायनिक बदल कोणते?


(a) रोपट्याची वाढ
(b)
लोखंडाचे गंजणे
(c)
लोखंडाचा चुरा आणि वाळू 
(d)
अन्न शिजविणे
(e)
अन्न पचन
(f)
पाणी गोठणे
(g)
मेणबत्तीचे ज्वलन

उत्तर –  रासायनिक बदल खालीलप्रमाणे -

(a) रोपट्याची वाढ

(b) लोखंडाचे गंजणे

(d) अन्न शिजविणे

(e) अन्न पचन

(g) मेणबत्तीचे ज्वलन

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.