SSLC KARNATAKA MARATHI SCORING PACKAGE (2,3 MARKS)

दहावी मराठी imp प्रश्नोत्तरे
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

  

 मराठी विषयातील महत्वाचे दोन तीन मार्कचे प्रश्न व त्याची उत्तरे 
 

गद्य विभाग

 दहावी वर्गातील मराठी विषयाचे महत्वाचे दोन गुणांचे , तेन गुणांचे,चार गुणांचे प्रश्न व त्यांची उत्तरे - 
संदर्भ व संकलन  - स्कोरिंग पॅकेज (विंदा करंदीकर शहर मराठी शिक्षक संघ बेळगाव.)
 

पाठ 3 – नोकर? छे! मालक

१) लेखक पाकगृहाच्या दारात उभे राहिल्यावर त्यांना कोणते दृश्य दिसले ?
उत्तर :- काकूंनी पाकगृहात बिछाना पसरून समोर बाजाची पेटी घेऊन त्या वाजवत होत्या.त्यांच्या खांदयावर त्यांचा आवडता पोपट विराजमान झाला होता व बोकोबा काकूंना खेटून पहूडले होते.

२) लेखक परिचय - चि. वि. जोशी
उत्तर :- कालखंड - १८९२- १९६३ पाली भाषेचा व्यासंग, वडोदा सरकारच दप्तरदार सहविचार नियतकालीकाचे संपादक, चिणराव आणि गुंड्याभाऊ या मानसपुत्रांना साहित्यातून लोकप्रिय केले.

साहित्य - विनोदी कथा संग्रह - एरंडाचे गुऱ्हाळ, चिणरावांचे चऱ्हाट, पुन्हा एकदा चिणराव, ओसाडवाडीचे देव, वायफळाचा ळा.


                                                                       


पाठ ४ जपानी स्त्री
आठ ते दहा वाक्यात उत्तरे लिहा.
१) हाऊस व्हाइज या संस्थेची माहिती लिहा
उत्तर :- जपान मधील या महत्त्वाच्या संस्थेची स्थापना १९४८ साली झाली. यांची खूण लाकडाचा मोठा हात असून मातीमोल होत चाललेल्या राष्ट्रांच्या संरक्षणासाठी पुढे आलेला हात.या गृहिणीनी वर्गणी जून सहा मजली इमारत बांधली. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे वर्ग तेथे चालतात. तेथेच वस्तूतील भेसळ तपासली जाते. सरकारवर यांचा वचक असून सरकार सुद्धा यांना दचकून असते. अशा या संस्थेच्या देशभर २०७ शाखा आहेत.

२) मदर्स युनियन या संस्थेची महिती लिहा
उत्तर :- ही जपान गधील महत्त्वाची संघटना असून १९४५ साली याची स्थापना झाली. कारण हिरोशिमावरील बॉम्ब हल्ल्यात अनेक घरे, कुटुंबे उध्वस्त झाली.त्यांना आश्रय देण्यासाठी याची स्थापना झाली. यांची तीन जली इमारत असून तेथे पालकांची संस्था, शिक्षक संघटनेचे ऑफिस,दर्स युनियनचे ऑफिस आहे. या संस्थेच्या अध्यक्षा ७०-७५ वर्षाच्या असूनही उत्साही होत्या.

पाठ ५ मेळघाटचे शिल्पकार
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा
१) डॉ. शिबिरांमध्ये कोणकोणत्या गोष्टीची माहिती दिली ?
उत्तर :- डॉ. सुरू केलेल्या शिबिरांगधून शेती,आरोग्य,पर्यावरण आणि शासकिय योजना या चार विषयाची माहिती देत.प्रत्येक विषयाचा संबंध मुलांच्या दैनंदि जीवनाशी कसा आहे हे सांगून शास्त्रोक्त शेतीचे फायदे,प्रात्यक्षिकासह दाखवत.आहार व आजार हे आरोग्य विषयातून सांगून पर्यावरणात जंगल संपत्तीचे रक्षण कसे गरजेचे हे सांगून शासकीय योजनांची माहिती,मार्गदर्शन केले जाई.यातून मुलांचा आत्मविश्वास वाढून व्यवहार ज्ञान दिले जाई.

२) शिबिराचा अदृश्य परिणाम कोणता ?
उत्तर :- आदिवासी भागात सुधारणा करण्यासाठी डॉ. शिबिरे घेऊन शेती, पर्यावरण, आरोग्य शासकीय योजना याची माहिती दिली. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढल्याने ती योग्य तेथे विरोध करू लागली. व जवळजवळ यामुळे पाचशेहे कार्यकर्ते तयार होऊन मेळघाटातील आसपासच्या गावात जाऊन शेती विषयक प्रयोग सुरु केले. व योजनांची माहिती सर्वांना देऊन स्वावलंबी बनवले. त्यामुळेच शेतकऱ्याच्या आत्महत्येचं लोण मेळघाटात पोहचू शकले नाही. 'हा शिबिराचा अदृश्य परिणाग होय.

   


पाठ ६ वाटणी
पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.

१) गणातात्यांनी अखेर कोणता निर्धार व्यक्त केला ? का?
उत्तर :- आपण नवरा बायको एकत्रच राहणार असा निर्धार गणातात्या व्यक्त करतात.कारण गणातात्यांना मुलांनी केलेली आपली वाटणी मान्य नसते,पण आईबापाची वाटणी करण्यास मुले ठा असतात. शेताची राखण करायला आयता गडी मिळणार म्हणून दोघांनाही तात्या हवा असतो,पण आजारी आई दोघांनाही नको असते.मुलांच्या स्वार्थी वागण्यावरून आपण नवरा बायको एकत्रच राहणार तुम्ही काय द्यायचे द्या नाहीतर जुरी करून जगू असे म्हणून नवरा बायको एकत्रच राहण्याचा निर्धार व्यक्त करतात.

२) वाटणीच्या घोळाने घरात काय घडत होते ? त्यावर कोणता उपाय सुचविला ?

उत्तर :- वाटणीच्या घोळाने घरातील कटकटी वाढत होत्या. शेतातील कामे खोळंबून राहत होती.तर कधी चूल बंद पडत होती.आठ दिवसापासून तर धुपुस अधिकच वाढली होती अशा भांडणात जगण्यापेक्षा वाटणी होणे फार चांगले असे गणातात्यांना वाटू लागले.म्हणून वाटणी करणे हाच योग्य उपाय आहे असे पंच मंडळींनी सुचविले.

   


पाठ ७ क्रांतीज्योती सावित्रीबाई
दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा
१) सावित्रीबाईबद्दल लोकांनी कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या?
उत्तर :- सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जाऊ लागल्यावर समाज त्यांना त्रास देऊ लागला. शाळेत शिकवितांना माणसे खिडक्यांसमोर उभे राहून घाण शिव्या द्यायची,शुद्र बाई शिक्षिका झाली.महाभयंकर,वाईट झाले,शुद्र फार माजले असे बोलून कोण वाट अडवी तर कोणी अंगावर थुंकी अशा वाईट प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या?.

२) "माझा काळ जवळ आला” (संदर्भासहित स्पष्टीकरण करा )
संदर्भ :- वरील उदगार सुषमा देशपांडे यांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पाठातील असून होय मी सावित्रीबाई या एकपात्री नाट्यातून निवडला आहे.

स्पष्टीकरण :- महात्मा फुलेंची तब्येत खालावत जात होती,तेव्हा अनेक मित्रमंडळी त्यांना भेटायला यायची.त्यावेळी लोकहितवादी,पंडीता रमाबाई यांना उद्देशून फुलेंनी म्हटलेल्या वाक्यातून त्यांना झालेला मृत्यूचा आभास दिसून येतो.

   

पाठ 8 आई समजून घेताना
दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा
१) आण्णाने काय काय करावे असे आईला वाटते ?
उत्तर :- दारू पिल्यामुळे आई रोज आण्णाला शिव्या द्यायची,भांडणे व्हायची त्यामुळे त्यांनी दारू सोडावी,रोज कामाला जावे,पैसे मिळवावेत, संसारासाठी वापरावेत,पोरांना शिक्षणासाठी द्यावेत, घर बांधावे,पोरांना कपडे द्यावेत व संसाराकडे लक्ष द्यावे असे आईला वाटते.

२) लेखक परिचय लिहा ?
उत्तर :- नाव - उत्तम मारुती कांबळे,

जन्म - ३१ मे १९५६, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक,

साहित्य -
अ) कादंबऱ्या- १) श्राद्ध २ ) अस्वस्थ ३ ) नायक

ब) कथासंग्रह - १) रंग माणसांचे २) कथा माणसांच्या ३) कावळे आणि माणसं ४)परत्या, न दिसणारी लढाई

क) संशोधन ग्रंथ- १) देवदासी २) नग्नपूजा ३) भटक्यांचे लग्न ४) कुंभमेळा ५) अनिष्ट प्रथा

ड) कवितासंग्रह - १) जागतिकीकरणात माझी कविता २) नाशिका तू एक सुंदर कविता
३) पाचव्या बोटावर सत्य

इ) आत्मकथने - १) आई समजून घेताना  २ ) वाट तुडवताना

ई) ललित पुस्तके - १) थोडसं वेगळं २) तिरंग्यातून गेला बाप

उ) अनुवाद -१) 'आई समजून घेताना' या पुस्तकाचे कन्नड, इंग्रजी व ब्रेल या लिपीत रूपांतर

२०१० साली ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते..

 

                                                        पाठ 9 स्वरगंगा

दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा
१) गंगूबाईच्या गळ्यावर शत्रक्रिया का झाली ? त्याचा काय परिणाम झाला ?
उत्तर :- कारण त्यांचा आवाज पातळ, नाजूक आणि बारीक होता. त्या गात असताना घसा दुखू लागे. त्यामुळे डॉक्टरांनी टॉन्सिल्सचे ऑपरेशन करण्यास सांगितले. ऑपरेशन नंतर त्यांचा आवाज बदलून पुरूषी झाला. तरीही न घाबरता त्यांनी सराव सुरूच ठेवला..

२) धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयातील वातावरण कसे होते ?
उत्तर :- राष्ट्रीय विद्यालयातील वातावरण देशप्रेमाने भारावलेले होते.गंगूबाईना देशप्रेमाचे धडे तेथेच मिळाले.तेथे मोठेमोठे साहित्यीक, राजकीय व्यक्ती येत. वंदे मातरम् व भारतमातेची वर्णनपर प्रार्थना येथे म्हटली जाई.आणि शिक्षणाबरोबर देशप्रेम, राष्ट्राभिमान वाढविण्याचे पोषक वातावरण या शाळेत होते.

३) “बहुत अच्छा बेटी, अब खूब खाना और बहोत गाना” (संदर्भासहित स्पष्टीकरण करा )
संदर्भ :- वरील उद्गार संध्या देशपांडे यांच्या 'स्वरगंगा ' या व्यक्तीचित्रणातील आहे.

स्पष्टीकरण :- अंबाबाई यांच्या घरी किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ होते. त्यावेळी लहान गंगूबाईना त्यांनी गायला सांगितले त्यानुसार गंगूबाईने पद म्हणून दाखविल्यावर तिचा ढंग आणि आवाज पाहून खाँ साहेबांनी गंगूबाईला म्हटलेल्या वरील वाक्यातून दिलेले प्रोत्साहन दिसून येते.

विषय - मराठी❇️
💠महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे💠


✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

 

SSLC उजळणी ऑनलाइन टेस्ट

 आजची उजळणी टेस्ट 

 🌻इयत्ता 10वी🌻 
 विषय : मराठी 
 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
3.भला जन्म हा..!!
👇👇👇👇👇👇👇👇

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

मराठी सराव टेस्ट
👇👇👇👇👇👇👇👇

All the best

 


टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.