DAHAVI VIDNYAN 6.JIVAN PRAKRIYA (दहावी - विज्ञान 6. जीवन प्रक्रिया मानवी पचन संस्था व श्वसन संस्था )

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

                                           


 मानवी पचन संस्था-

अवयव -
तोंड

👉तोंडाद्वारे अन्नग्रहण केले जाते.
👉संयुक्त स्वरूपातील अन्न बारीक कणात दाताद्वारे रूपांतर होते.
👉अन्नाची चव कळते.
👉लालोउत्पादक ग्रंथीद्वारे लाळ तयार होते.
👉अमायलेज - स्टार्चचे विघटन करून साध्या शर्करेत रूपांतर.

 


घसा  -

 हा भाग अन्ननलिकेचा व श्वसन नलिका चा सामाईक भाग आहे. तोंडात बारीक झालेले अन्न घशाद्वारे पुढे ढकलले जाते येथे पचन व शोषण होत नाही.


अन्ननलिका  -
👉अन्नाचे हन करणारा भाग.

👉अन्न तात्पुरत्या काळासाठी येथून जाते.याची लांबी 25 सेंटिमीटर असते.


जठर - शरीराच्या डाव्या बाजूस जठर असते.तोंडावाटे बारीक केलेले अन्न जठरात येते.जठर हा मोठा अवयव आहे.येथे चार ते पाच तासासाठी अन्न साठविले जाते.जठरात जाठर ग्रंथीद्वारे अन्नाचे पचन होते.


जाठर रस
a)
मप
b)
पेप्सीन -प्रोटीन्सचे पचन करते.
c)HCl -
जीवजंतू वर हल्ला करतात.
d)
श्लेषम- जठराच्या भित्तीचे आमला पासून रक्षण करते.


स्वादुपिंड


ट्रीप्सीन -  प्रोटीन्सचे पचन करते.


लापेज - मेदाचे पचन करते.

अमायलेज - कर्बोदकांचे पचन करते.


यकृत - ही सर्वात मोठी ग्रंथी आहे.या यकृतात पित्ताशय असते.तेथे पित्तरस साठवले जाते.पित्तरस आम्ल लहान आतड्यात पाठवले जातात.इतरच स्निग्ध पदार्थांचा आकार लहान करतो.या क्रियेला इमल्सीफिकेशन असे म्हणतात.

 


लहान आतडे  -
*हे आंत्ररस,प्रोटिन्सचे विघटन करून अमिनो आम्लात रुपांतर करते.
*
संयुक्त कार्बोहायड्रेटचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करते. स्निग्ध पदार्थांचे रुपांतर स्निग्धाम्ले व गलिसरॉल. *पचन झालेल्या अन्नाचे शोषण लहान आतड्यात पार पडते.आंत्ररस तयार होतो.
*
लहान आतड्यात बोटासारखी शोषणेंद्रिये असतात. यांच्यामुळे शोषण क्रिया पार पडते.


मोठे आतडे -
शोषून न घेतलेले
अन्न मोठ्या आतड्यात पाठवले जाते.तेथे पाण्याचे शोषण होते व राहिलेले पदार्थ म्हणजेच विष्टा गुदद्वारा द्वारे पाठवली जाते.


गुदद्वारा -स्पिंटर नियंत्रण ठेवते.
येथे स्फिकंटर नावाची स्नायू असल्यामुळे गुदद्वारा वाटे विष्टा सहज बाहेर टाकली जाते.(अपेंडिक्स हा अवयव मोठ्या आतड्याला जोडलेला असतो.)


पचनाचे टप्पे

*अन्नग्रहण

*पचन

*शोषण

*सात्मीकरण

     *विसर्जन

 

मानवी श्वसन संस्था-

 1. नाक

 या विभागामार्फत O2 ऑक्सिजन आत जातो.येथे सूक्ष्म केसांच्या मार्फत हवा गाळली जाते.
2. घसा

हा भाग हवा कशा मधून फोटोचा मार्फत श्वासनलिका मार्फत ढकलतो.
3. श्वसन नलिका

 श्वसन नलिकेवर कुच्या वलये असतात.त्यामुळे श्वसननलिकेचा आकार वाढतो आधार मिळतो. ही नलिका वायूंचे वहन करण्यास मदत करते.
श्वसननलिकेचे दोन प्रकार पडतात.त्यास श्वसनी म्हणतात.

एकश्वसनी डाव्या फुप्फुसात तर दुसरी उजव्या हातात शिरते.
4. फुप्फुस -मानवी शरीरात फुप्फुसाची एक जोडी शरीराच्या दोन्ही बाजूला असते फुप्फुसात असंख्य श्वसन्या असतात.त्यामुळे तेथे फुप्फुसाचे क्षेत्रफळ वाढते.
5. वायुकोष- प्रत्येक श्वासनलिकेच्या टोकाला फुग्यासारखा भाग असतो त्यास वायुकोष असे म्हणतात.वायुकोषात वायूंची अदलाबदल होते.वायुकोषात वाहिन्यांचे जाळे असते तेथे ऑक्सिजनयुक्त रक्त स्वीकारतात व हृदयाकडे पाठवतात.मानवी श्वसन क्रियेत विशिष्ट कण म्हणजे हिमोग्लोबिन होय.हिमोग्लोबिनला ऑक्सिजनचे आकर्षण असते.हे कण तांबड्या रक्तपेशीत आढळतात,त्यामुळे ऑक्सिजन रक्तवाहिन्यांचे मार्फत प्रत्येक पेशीला पुरवठा होतो. आणि नको असलेला CO2 द्रवरूप स्थितीतून रक्ताद्वारे वाहून नेला जातो आणि उच्छवासामधून बाहेर टाकले जाते.
abc 

प्रश्न -: 
1. आम्लाचे आपल्या जठरात कोणते कार्य असत?

त्तर - अन्नाचे पचन करणे आणि जंतूंचा नाश करणे.

2. पाचक विकाराचे कार्य कोणते?
a. कार्बोदकांचे पचन करणे.
b. मेदाचे पचन करते.
c. प्रोटिन्सचे पचन करते.

3.पचन झालेल्या अन्नाचे शोषण करण्यासाठी लहान आतड्यामध्ये कोणती रचना असते?

उत्तर - बोटासारखी असंख्य लहान अवयव असतात.त्यांना शोषणेंद्रीये असे म्हणतात.

4. श्वसनासाठी ऑक्सिजन मिळवताना जमिनीवरील प्राण्यांना पाण्यातील प्राण्यापेक्षा कोणता फायदा होतो?
उत्तर - कारण जमिनीवर जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतो व पाण्यात कमी असतो त्यामुळे जलचर प्राण्यांना श्वास घेणे कठीण असते.

5. मानवामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड कसे वाहून नेले जातात?
उत्तर - प्रत्येक श्वासनलिकेच्या टोकाला फुग्यासारखा भाग असतो त्यास वायुकोष असे म्हणतात.वायुकोषात वायूंची अदलाबदल होते.वायुकोषात वाहिन्यांचे जाळे असते तेथे ऑक्सिजनयुक्त रक्त स्वीकारतात व हृदयाकडे पाठवतात.
          मानवी श्वसन क्रियेत विशिष्ट कण म्हणजे हिमोग्लोबिन होय.हिमोग्लोबिनला ऑक्सिजनचे आकर्षण असते.हे कण तांबड्या रक्तपेशीत आढळतात,त्यामुळे ऑक्सिजन रक्तवाहिन्यांचे मार्फत प्रत्येक पेशीला पुरवठा होतो. आणि नको असलेला CO2 द्रवरूप स्थितीतून रक्ताद्वारे वाहून नेला जातो आणि उच्छवासामधून बाहेर टाकले जाते.

रक्तवाहिन्या
प्रवाहिनी -ही रक्तवाहिनी हृदयाकडून रक्त अवयवांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते.या वाहिनीवर रक्त दाब अधिक असतो.त्यामुळे प्रवाहिन्यांच्या पेशीभित्ती जाड असतात.

केशवाहिनी -प्रवाहिन्यांचे लहान लहान नलिकांमध्ये विभाजन होते त्या लहान नलिकांना केशवाहिनी म्हणतात.

प्रतिवाहिनी -
प्रतिवाहिन्या शरीराच्या विविध विभागाकडून रक्त गोळा करतात व हृदयाकडे आणतात.यांच्या पेशी भित्ती नसतात.यांच्यावर रक्तदाब नसतो फक्त एकाच दिशेने प्रवाहित होते.   CLICK HERE TO DOWNLOAD PDF 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.