SCHOOL EVALUATION TIME TABLE 2021-22

2021-22 वर्षात शाळेतील परीक्षेसंबंधी वेळापत्रक पुढीलप्रमाणे...फक्त याच वर्षासाठी 4 रुपणात्मक मूल्यमापन (FA) व 1 संकलनात्मक मूल्यमापन (SA) घेण्यात यावे
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated


        दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित कर्नाटक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार 2021-22 सालातील कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या शाळेत पहिली ते दहावी चे मौल्यांकन  (परीक्षा) पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.

  2021-22 या शैक्षणिक वर्षात कोविड 19 च्या परिणामाने शैक्षणिक कालावधी बदलला असल्याने मिळणाऱ्या अवधीत अध्ययन अध्यापन कार्य चालू राहावे यासाठी मार्गदर्शन होईल या उद्देशाने खालील वेळापत्रक व सुचना सांगण्यात आल्या आहेत.दिनांक 01/07/2021 पासून कर्नाटकातील सरकारी,अनुदानित व अनुदानरहित शाळेतून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अध्ययन - अध्यापन प्रक्रिया सुरु आहे.या परिस्थितीतीत विद्यार्थ्यांचे शाळेकडून निरंतर मूल्यमापन व्हावे या उद्देशाने पुढील वेळापत्रक देण्यात आले आहे.

     2021-22 वर्षात शाळेतील परीक्षेसंबंधी वेळापत्रक पुढीलप्रमाणे...फक्त याच वर्षासाठी 4 रुपणात्मक मूल्यमापन (FA) व 1 संकलनात्मक मूल्यमापन (SA) घेण्यात यावे असे सांगितले आहे.

   


सूचना

1. कोविड -19 च्या प्रतिकूल परिस्थितीत शाळेत प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने मुलांना पर्यायी माध्यमांद्वारे (दूरदर्शन, e संवेद, रेडिओ कार्यक्रम, ऑनलाइन वर्ग, दूरध्वनी संप्रेषण आणि इतर ऑफलाइन चॅनेल) विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवावे. शाळेने निरंतर मूल्यमापन सुरु ठेवून आपल्या शाळेतील कोणत्याही मुलाला त्याच्या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये.

2. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मुल्यांकन कार्य करून त्याला संबंधित दाखले विद्यार्थ्यांच्या कृती संपुट (CHILD PROFILE) मध्ये ठेवावे. उदाहरणार्थ –शिक्षकांनी मुलांना दिलेल्या प्रश्नपत्रिका,ऑनलाईन परीक्षेचे गुण किंवा ऑनलाईन अपलोड केलेल्या उत्तरपत्रिका यांच्या SOFT किंवा हार्ड कॉपी संग्रहित करून ठेवणे.

3. खाली दिलेल्या वेळेत सर्व मुल्यांकन प्रक्रिया पार पाडावी.जर कोणत्याही कारणास्तव एखादा विद्यार्थी गैर हजार असेल तर त्या मुलाने आदी सोडवलेल्या प्रश्नपत्रिका,इतर कृती यांच्या आधारे त्याचे मुल्यांकन कार्य पूर्ण करणे.

4. शिक्षकांनी सर्व मूल्यांकनाचे वैयक्तिक व एकत्रित रजिस्टर ठेवावे.

5. रुपणात्मक आणि संकलनात्मक मूल्यमापनच्या लेखी परीक्षा घेताना कोविड -19 च्या सावधगिरीच्या उपायांचे पालन करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रश्नपत्रिका काढून त्याच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि मूल्यमापन करावे.

6. कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने भाग-बी मधील विषयांच्या लेखी किंवा प्रात्यक्षिक कृती राबवणे. याबाबत सविस्तर परिपत्रक नंतर दिले जाईल.

7. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी तयार केलेले वैयक्तिक गुणांचे रजिस्टर वेळोवेळी तपासून पहावे. तसेच शाळेचे एकत्रित मुल्यांकन रजिस्टर तयार करून ते वेळोवेळी भारत आहेत का याची खात्री करून घ्यावी.

8. कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून इयत्ता 1 ते 10 वर्गांचे रुपणात्मक मूल्यांकन करताना मुलांचे गृहपाठ, सराव पेपर, इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपक्रमांचा विचार करावा. विद्यार्थ्यांना आपण दिलेले उपक्रम/प्रकल्प सोपे असावेत आणि ते उपक्रम करण्यासाठी मुलांनी स्वेच्छेने त्यात भाग घ्यावा.तसेच या उपक्रमांचा पालकांवर आर्थिक भार पडणार यांची दक्षता घ्यावी.

 सरकारी कन्नड आदेशाचा कांही भाग येथे भाषांतर करून देण्याचा प्रयत्न केला आहे.अधिक माहितीसाठी सरकारी आदेश पहावा.

सरकारी आदेशासाठी येथे क्लिक करा. CLICK HERE


 


1 ली ते 8 वी साठी मुल्यांकन वेळापत्रक -  

विवरण

गुण

कृती घेण्याचा कालावधी

सेतुबंध

-

जुलै 2021(पूर्ण महिना)

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 1

(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये रुपांतर करणे.)

15

06/09/2021

ते

08/09/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 2 -(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये रुपांतर करणे.)

15

28/10/2021

ते

30/10/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 3 –

(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये रुपांतर करणे.)

15

13/12/2021

ते

15/12/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 4 -(या कालावधीत विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव अभ्यास, तसेच गृहपाठ, स्व-अध्ययन उपक्रम व इतर कृती यांचे एकूण 15 गुणांमध्ये रुपांतर करणे.)

15

27/01/2022

ते  

29/01/2022

संकलनात्मक मूल्यमापन (SA)

1ली ते 5 वी साठी 20 गुण (लेखी परीक्षा ) + 20 गुण (तोंडी परीक्षा)

 

1ली ते 5 वी इंग्रजी भाषा परीक्षा –

10 गुण लेखी परीक्षा + 30 गुण तोंडी परीक्षा)

 

6वी ते 8वी – 30 गुण (लेखी परीक्षा) + 10 गुण (तोंडी परीक्षा)

40

11/04/2022

ते

20/04/2022

वार्षिक निकाल      एकूण

100

1 ली ते 8 वी च्या वर्गांचा निकाल 29/04/2022 रोजी समुदायदत्त शाळा कार्यक्रमात निकाल जाहीर करणे.

 

 

 


  9वी व 10वी साठी मुल्यांकन वेळापत्रक -  

विवरण

गुण

कृती घेण्याचा कालावधी

सेतुबंध

-

जुलै 2021(पूर्ण महिना)

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 1

( 2 Activity [15 + 15 गुण ]  )

( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } )

एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

20

06/09/2021

ते

08/09/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 2

( 2 Activity [15 + 15 गुण ]  )

( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } )

एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे.

28/10/2021

ते

30/10/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA) 3

( 2 Activity [15 + 15 गुण ]  )

( 1 पेन पेपर टेस्ट {20 गुण } )

एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे.

13/12/2021

ते

15/12/2021

रुपणात्मक मूल्यमापन (FA)  4

( 2 Activity [15 + 15 गुण ]  )

( 1 पेन,पेपर टेस्ट {20 गुण } )

एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे.

27/01/2022

ते  

29/01/2022

अंतर्गत मूल्यमापन -  9वी व 10वी वर्गांसाठी घेण्यात आलेले ५० गुणांचे 4 रुपणात्मक परीक्षेचे एकूण 200 गुणांचे सरासरी 20 गुणात रुपांतर करणे.

 

संकलनात्मक मूल्यमापन (SA)

 

इयत्ता नववी –

80 गुणांची लेखी वार्षिक परीक्षा घेणे.

 

इयत्ता – दहावी

कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियोजनानुसार 80 गुणांची सराव परीक्षा घेणे.

80

11/04/2022

ते

20/04/2022

वार्षिक निकाल           एकूण

100

इयत्ता नववी वर्गाचा निकाल 30/04/2022 रोजी समुदायदत्त शाळा कार्यक्रमात निकाल जाहीर करणे.

 

 सरकारी कन्नड आदेशाचा कांही भाग येथे भाषांतर करून देण्याचा प्रयत्न केला आहे.अधिक माहितीसाठी सरकारी आदेश पहावा.

सरकारी आदेशासाठी येथे क्लिक करा. CLICK HERE


 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.