chouthi marathi 3. darodari ek zad (चौथी मराठी 3. दारोदारी एक झाड )

 

पाठ 3. दारोदारी एक झाड

स्वाध्याय

नवीन शब्दांचे अर्थ

Ø  कैऱ्या
 लहान, कच्चे हिरवे आंबे

Ø  त्वचारोग – शरीरावरील कातडीला होणारे रोग

Ø  रोप लहान रोपटे

Ø  पन्हे कैरीचे सरबत

अ) खालील प्रश्नांची
उत्तरे एका वाक्यात लिही.

१) मुले प्रार्थनेला
कुठे जमली
?

उत्तर – मुले
प्रार्थनेला
पटांगणात जमली.

२) वनमहोत्सव केव्हा
साजरा करतात
?

उत्तर – वनमहोत्सव
जुलै महिन्यात
साजरा करतात
.

३) कच्या कैऱ्यांपासून
कोणते पदार्थ तयार केले जातात
?

उत्तर – कच्च्या कैऱ्यापासून पन्हे,चटणी,जाम,लोणचे हे
पदार्थ तयार केले जातात.

४) वनमहोत्सव म्हणजे
काय
?

उत्तर – वनमहोत्सव म्हणजे वाणांचा मोठा उत्सव.

५) पावसाचे प्रमाण कमी
का होत आहे
?

उत्तर – झाडे तोडल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

६) कोणते शहर ग्रीन सिटीम्हणून ओळखले जाते ?

उत्तर – बेंगळूरू हे शहर ग्रीन
सिटी
म्हणून ओळखले जाते

इ) खालील वाक्य कोणी
कोणाला उद्देशून म्हटले आहे ते लिही.

 

१) मी आंब्याचे रोप आणले आहे”

उत्तर – वरील वाक्य श्रीधरने शिक्षकांना उद्देशून म्हटले
आहे.

२) ये वेडाबाई!

उत्तर – हे वाक्य गोविंदने मंजिरीला उद्देशून म्हटले आहे.

३) वनमहोत्सव म्हणजे वनाचा मोठा
उत्सव”

उत्तर – हे वाक्य शिक्षकांनी महादेवाला उद्देशून म्हटले
आहे.

४) सर, सारीच
झाडे उपयुक्त आहेत का हो
?”

उत्तर – हे वाक्य जॉंनने शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.

५) सर, आणखी
औषधी वनस्पती कोणकोणत्या
?’

उत्तर – हे वाक्य सायलीने शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.

ई) खालील वाक्य
अर्थपूर्ण पद्धतीने लिही.

१) पानांचे तोरण / जाते
/ बांधले शुभप्रसंगी.

उत्तर – शुभप्रसंगी पानांचे तोरण बांधले जाते.

२) आहे / रोप / तुळशीचे
/ मी / आणले.

उत्तर – मी तुळशीचे रोप आणले आहे.

३) प्राणवायूचा /
तुळशीच्या / पुरवठा / रोपामुळे / होतो / भरपूर.

उत्तर – तुळशीच्या रोपामुळे प्राणवायुचा भरपूर पुरवठा होतो.

४) उपयुक्त / सारीच /
आहेत / झाडे.

उत्तर – सारीच झाडे उपयुक्त आहेत.

५) हवा / राहते / शुद्ध
/ झाडामुळे

उत्तर – झाडामुळे हवा शुद्ध राहते.




Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *