BRIDGE COURSE POST-TEST CLASS 4 इयत्ता चौथी सेतुबंध साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका विषय -मराठी

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

      इयत्ता - चौथी            

सेतुबंध परीक्षा  

  

विषयमराठी 

पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका 

तोंडी परीक्षा 

1) तुझ्या जीवनातील एखादी घटना किंवा प्रसंग सांग .(प्रत्येक विद्यार्थ्याकडून विचारून घेणे.)

2) तुझ्या आवडत्या पत्रानुसार मित्रा सोबत संभाषण कर.(उदा. कंडक्टर प्रवासी वर्गात नवीन आलेल्या मित्रासोबत संभाषण)

3) तुझ्या मित्राच्या वहीतील परिच्छेद वाच. (वेगवेगळ्या मुलांच्या वहीतील हस्तलेखन वाचून घेणे.)

4) सुट्टीच्या दिवसात तू काय काय केलास ते सांग.

 

         प्रायोगिक परीक्षा

5) तुझ्या आवडीचे अभिनय गीत अभिनयासहित गा.

6) सूचना फलकावरील सूचनांची योग्य चित्राशी जोडी लावून सांग.


1) रस्ता ओलांडताना झेब्रा पट्टी वरुनच चालावे.

2) रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला.

3) शांतता राखा.

4) बागेतील फुले तोडू नका.

7) गोष्ट पूर्ण कर.

          एक ससा होता.तो खूप जोरात धावत असे.त्याने एकदा सावकाश चालणाऱ्या कासवाला पाहिले. त्याने कासवासोबत धावण्याची पैज लावली.--------------------
 

9)कोष्टकातील शब्द योग्य क्रमाने वापरून अर्थपूर्ण वाक्य बनव.

राधा

 

जातो

तू

शाळेला

जाते

गणेश

 

जातोस


10) ऐकलेल्या उताऱ्याचे श्रुतलेखन करा.(3-4ओळींची संक्षिप्त माहिती लिहून घेणे.)


लेखी परीक्षा

11)' गाणे' या शब्दाचा वाक्यात उपयोग करून लिही.

12) अर्थानुसार गटात जुळणारा शब्द वेगळा करून लिही.

फुल, कुसुम, सुमन, समर, पुष्प

13) खालील अक्षरे योग्य क्रमाने जोडून अर्थपूर्ण शब्द बनव आणि त्याचा वाक्यात उपयोग करून लिही.

   दा, बे, , डू, दा --------------------

14) योग्य विरामचिन्हांचा वापर करून खालील वाक्य पुन्हा लिही.

    बापरे किती मोठी इमारत

15)'माझे कुटुंब'याविषयी तीन चार ओळी माहिती लिही.

16) कवितेतील लयबद्ध शब्दांची जोडी ओळखून लिही.

       इकडून तिकडे झाडावरती

         सरसर पळते खार

       करत वाकुल्या मला हसविते

          शेपूट गोंडेदार ||

 

17) उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

       रोहित त्याचे आजोबा एके दिवशी संध्याकाळी बाजारात निघाले होते . बाजारात जायचे म्हणताच त्याला खूप आनंद झाला. तो घाईघाईने आजोबांबरोबर जाण्यास तयार झाला.

प्रश्न 1) बाजारात कोणकोण निघाले होते?

प्रश्न 2) रोहितला आनंद का झाला?

18)खालील कोडे वाचून उत्तर सांग.

 कात नाही, चुना नाही तोंड माझे रंगले

 पीक नाही,पाणी नाही अंग माझे हिरवे

 ओळखा पाहू मी आहे कोण?

 19) नमुन्याप्रमाणे समानार्थी शब्दांची मालिका लिही.

मुख  - तोंड, वदन, आनन

घर    _________________

20) अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा.

   साखर गोड असते, पण कारले ------------ असते.

 


   


 

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.