NEWS 03/05/2021

आजच्या महत्वाच्या बातम्या
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

IPL खेळाडूंना कोरोनाची लागण - 

'केकेआर' संघाला कोरोनाचा विळखा, आयपीएल धोक्यात! -

आजची कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे; कोलकाता नाइट रायडर्स संघातील अनेक खेळाडूंची प्रकृती बरी नसल्याने निर्णय...

आयपीएल-२०२१ स्पर्धा कोरोनामुळे धोक्यात आली आहे. कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघात आज (ता.3) सामना होणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी केकेआर संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

कोरोनाच्या सावटाखाली यंदाची आयपीएल स्पर्धा होत आहे. त्यामुळे खेळाडूसाठी कडक बायोबबल केले होते. त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू केली होती. मात्र, त्यानंतरही कांही  खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय काही खेळाडूंची तब्बेत बिघडल्याचे वृत्त होते. कोरोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे.


💁🏻 'बीसीसीआय'च्या अधिकाऱ्यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले, की "कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आली. त्यामुळे आजचा सामना लांबणीवर टाकला आहे."


🦘 मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय हे कोरोनाच्या भीतीने मायदेशी परतले होते. त्यानंतर आर. अश्विनने घरच्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

🤷🏻‍♂️ स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर त्यांचे संघात पुनरागमन झालं होत.


😨 खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण

वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. देशातील कोरोनाची स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो- अदर पुनावाला


एका अहवालानुसार, अदर पुनावाला म्हणाले की, "जुलै महिन्यापर्यंत लसींचं उत्पादन 60 ते 70 मिलियनपासून 100 मिलियनपर्यंत वाढू शकतं."

देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी

 कोविड टास्क फोर्सने म्हटले," संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक", सरकार आज निर्णय घेऊ शकते; राज्यांनी केला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय

👨🏻‍⚖ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर सुप्रीम सुनावणी

कोर्टाने म्हटले आहे की,लॉकडाऊन आणि व्हॅक्सीन पॉलिसीवर केंद्राने विचार करावा, लोकल आयडीच्या नावावर रुग्णालये रुग्णांना नाकारू शकत नाहीत.

🌟 सोने-चांदी आजचे दर

सोन्याचा भाव - सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याचा दर 270 रुपयांनी वाढून 47,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

चांदीचा भाव - एमसीएक्सवर वायदा चांदीची किंमत 401 रुपयांनी वाढून 67,925 रुपये प्रति किलोग्रॅमवर, स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत 25.90 डॉलर प्रति औंस

पश्चिम बंगाल: टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार, भाजपाच्या डॉ. रतिन चक्रवर्ती यांना पराभूत करत राजकारणाच्या मैदानावर रॉयल एन्ट्री...

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.