2 Marks Questions Science

SSLC मागील वार्षिक परीक्षेत विचारले गेलेले 2 मार्क्सचे प्रश्न...
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated


SSLC Supplimentray Exam SEP. 2020

III. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

17. जिवाश्मांचे वय शोधण्याच्या ( अंदाज करण्याच्या ) दोन पद्धतीचे वर्णन करा.

18. पाण्याच्या आम्लीय द्रावणातून विद्युतधारा प्रवाहीत होते हे दर्शविणाऱ्या उपकरणांच्या मांडणीची आकृती काढा आणि विद्युत घटाला नांव द्या.

किंवा

    विरल सल्फ्यूरीक आम्लाबरोबर जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया आणि हेड्रोजन वायूचे ज्वलन करुन परीक्षा करणे हे दर्शविणाऱ्या उपकरणांच्या मांडणीची आकृती काढा आणि जस्ताच्या कणांच्या भागाला नांव द्या.

19. चपाती अत्यंत सावकाशपणे चावून खाल्याने गोड चव येते, का ?  x 2 = 16

20. वस्तूचे अंतर आणि भिंगाच्या प्रतिमेचे अंतर अनुक्रमे -30 cm आणि -10 cm आहे. त्याचे विशालन काढा आणि वापरलेल्या भिंगाचा प्रकार व प्रतिमेचे स्वरूप शोधा.

21. एका व्यक्तीचा चेहरा निस्तेज झाला आहे आणि भितीमुळे श्वसनाचा दर वाढला आहे. या घटनेचा सामना करण्यास मदत करणाऱ्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण करा.

22. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीच्या मर्यादांची दुरुस्ती आधुनिक आवर्त सारणीमध्ये कशी करण्यात आली ?

किंवा

आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुचा आकार गट आवर्तनात कसा बदलतो ? का ?

23. खालील विद्युत मंडळ आकृतीचे निरीक्षण करा :

मंडळामध्ये वाहणारी एकूण विद्युत धारा आणि एकूण विद्युत रोध काढा.

24. कॉपर सल्फेटच्या द्रावणापासून कपरचे ( तांब्याचे ) शुद्धीकरण करण्याच्या उपकरणाची

आकृती काढा. त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

(a) कैथोड

(b) नोड माती


SSLC Exam June- 2020

III.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

17. कृषि वैद्न्यानिकानी शेत जमिनीमध्ये काही प्रमाणात चुन्याची पावडर ( Lime powder ) मिसळण्याची सुचना केली आहे. याचे कारण कोणते असावे ? वर्णन करा.

18. "बेडूक आणि पालीच्या शरीराचे तापमान परिसरा ( पर्यावरणा ) च्या तापमानावर अवलंबून असते." याचे समर्थन करा.

19. पाण्याच्या आम्लीय द्वावणामधून विद्युत धारा प्रवाहीत होते हे दर्शविणा-या उपकरणाची आकृती काढा, त्याच्या खालील भागांना नाव द्या.

(i)विरल HCI द्रावण (ii) रबरी बुच.

किंवा

विर सल्फ्यूरीक आम्लावरोबर जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया आणि हैड्रोजन वायूचे ज्वलन करून परीक्षा घेण्याच्या उपकरणांच्या मांडणीची आकृती काढा.त्याच्या खालील भागांना नांवे द्या.

(i)रीक्षा नळी

(ii) साबणाचे द्रावण.

20. एक मी. लांबीच्या मंगनिज तारेचा 20°C मध्ये विशिष्ट रोध 1:84 x 10-6 m आहे.जर तारेचा व्यास 3 ´ 10-4 m आहे, तर त्याच तपमानात तारेचा विद्युत रोध किती होईल ?

किंवा

दिलेल्या विद्युत मंडळ आकृतीचे निरीक्षण करा.

विद्युत मंडळातील एकूण विद्युत रोध आणि मंडळात चाहणारा एकूण विद्युत प्रवाह काढा.

21. ऊर्जा प्रगतीने अन्न साखळीच्या विविध स्तरामध्ये पोहोचते परंतु ही आधीच्या ( अगोदराच्या ) स्तरासाठी उपलब्ध नसते. ( राहात नाही ). याचे कारण लिहा.

22. खालील घटनामध्ये धातूंच्या कोणत्या भौतिक गुणधर्माचा उपयाग केला आहे

(i) सोन्याचा उपयोग दागिने बनविण्यासाठी केला जातो.?

(ii) निकेलचा वापर गिटारच्या ( Guitar ) तारामध्ये (Strings ) केलेला असतो.

23. परागकणांचे किंजल्कावरील अंकुरण दर्शविणारी आकृती काढा आणि परागवाहिनी भागाला नांव द्या.

24. साध्या विद्युत जनित्राची आकृती काढा.त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

(i) ब्रश (Brushes )

(ii) कडे (Rings )

खालील सर्व प्रश्न PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा..

MARCH/APRIL 2019

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

19. अॅग्मीटर ( ammeter ) आणि व्होल्टमीटर ( voltmeter) सह R,, R, आणि R, हे रोध समांतर जोडणी मध्ये जोडलेल्या विद्युत मंडळाची आकृती काढून विद्युत प्रवाहाची दिशा दर्शवा.

20. जेव्हा लेड नायट्रेट ( शिशाचे नायट्रेट ) ला उष्णता दिली जाते तेव्हा मुक्त झालेल्या तपकिरी धुराचे ( Brown fumes ) नाव लिहा. या क्रियेचे समतोलीत रासायनिक समीकरण लिहा.

21. वनस्पतीमधील अन्न घटकांच्या वहन ( translocation ) ( स्थानांतरण ) क्रियेचे वर्णन करा.

किंवा

मानवाच्या लहान आतड्यामधील पचन क्रियेचे वर्णन करा.

22. साध्या विद्युत मोटारीची सुबक आकृती काढून त्याच्या खालील भागांना नाव द्या :

(i) अर्ध कडे

(ii)ब्रश.

23. रचनात्मक समघटक (Isomers ) म्हणजे काय ? रचनात्मक समघटना (Isomerism)

दर्शविणाऱ्या अल्केन्सच्या पहिल्या सदस्याचे नांव लिहा.

24. फुलाचा उभा छेद दर्शवणारी सुबक आकृती काढून त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

(i) किंजल ( style )

(ii)परागकोष | Anther),

25. विरल सल्फ्युरीक आम्लाबरोबर जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया आणि हेड्रोजन बायूचे ज्वलन

करून परीक्षा घेण्याच्या उपकरणांच्या मांडणीची आकृती काढा आणि त्याच्या खालील भागांना नांवे

(1) साबणाचे द्रावण

(ii) वायूवाहक नलीका.

26. विद्युत उपकरणे एकसर जोडणीत जोडण्यापेक्षा समांतर जोडणीत जोडणे फायद्याचे आहे. का ?

किंवा

उष्णतेच्या ज्युल्सूच्या नियमावर आधारित रोधामध्ये निर्माण झालेली उष्णता कोणत्या घटकावर अवलंबून असते. या नियमानुसार निर्माण झालेली उष्णता काढण्यासाठी वापरलेले सूत्र लिहा.

27. जीवाश्म इंधनाच्या फायद्यांची यादी करा.

किंवा

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी कमी वापर' Reduce आणि 'पुनर्वापर' | Reuse ) पद्धतींच्या फायद्यांची यादी करा,

28. आंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 30 cm आहे. तर भिंगा पासून 20 cm अंतरावर प्रतिमा तयार करण्यासाठी वस्तू कोणत्या अंतरावर ठेवली पाहिजेत ?

29. पाण्याच्या अपघटनासाठी ( पृथःकरणासाठी ) वापरलेल्या उपकरणार्थी सुबक आकृती काढा आणि त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

(1) ग्राफाईटची कांडी

(ii)कॅथोड


SSLC

 

1 टिप्पणी

  1. Physcis important question sanga please
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.