SSLC EXAM. SOCIAL SCIENCE

आधीच्या बोर्ड परीक्षेत विचारले गेलेले 1 गुणाचे प्रश्न ...
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

SSLC EXAM. SEP – 2020

I.खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापेकी एक पर्याय बरोबर आहे. बरोबर असलेला पर्याय निवडून त्याच्या इंग्रजी मुळाक्षरासह पूर्ण उत्तर दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहा :  8x1-8

1 साल्बाइच्या तहाने हे युद्ध संपले.

(A) दुसरे अँग्लो-मराठा युद्ध

(B) दुसरे अँग्लो शिख युद्ध

(C) पहिले अल्लो-मराठा युद्ध

(D) पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध,

2. 1938 च्या हरिपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते.

(A) सरदार वल्लभभाई पटेल

(B) डॉ० बी० आर० आंबेडकर

(C) बाळ गंगाधर टिळक

(D) सुभाष चंद्र बोस,

3. 1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीचा मुख्य उद्देश हा होता.

(A) संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना UNO )

(B) मानवी हक्काचे रक्षण

(C) परकियांचे आक्रमण थांबविणे

(D) राष्ट्रसंघाची स्थापना करणे,

4. नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व यानी केले.

(A) मेधा पाटकर

(B) 'डॉ० शिवराम कारंत

 (C) कुसुम सोरव

 (D) सुंदरलाल बहुगुणा.

5 बालकांचा सहाय्य दुरध्वनी क्रमांक हा आहे.

(A) 1098

(B) 1090

(C) 1089

(D) 1097,

6. खालील ऐकी योग्य जळणारी जोड़ी ही आहे.

(A) आंधिस - पश्चिम बंगाल

(B) काल बैसाको - पंजाब

(C) मंगोशांवर्स - तमीळनाडू

(D) कॉफीकारंजा - कर्नाटक,

7. 2014 मध्ये भारताचे मानवी विकासाचे सूचक इतके होते.

(A) 0.586

(B) 0.344

(C) 0.562

 (D) 0.856

8.धवल क्रांतीचे जनक –

(A) डॉ. प्रताप रेड्डी

(B) नारायण मूर्ती

(C) वर्गीस कुरियन

 (D) अझीम प्रेमजी

 


II. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.                8 x 1 = 8

9. 1798 नंतर हैद्राबादच्या संस्थानात ब्रिटिशांची एक सैन्य तुकडी ठेवावी लागली, का ?

10, रामकृष्ण मिशन ( रामकृष्ण मठ ) ची स्थापना का केली ?

11. अन्न आणि कृषिविषयक संघटनेचा (FAO ) मुख्य उद्देश काय ?

12. कैगा अणुभट्टी विरोधी चळवळ का करण्यात आली ?

13. बाजूकडील माती ( लटेराईट माती ) कशी बनते ?

14. लोकसंख्या घनतेची व्याख्या लिहा.

15. एका देशाचे दरडोई उत्पन्न कसे मोजले जाते ?

16. दरवर्षी 15 मार्च हा दिवस 'जागतिक ग्राहक दिन' म्हणून का समजला जातो ?


SSLC EXAM JUNE 2020

1.खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापेकी एक पर्याय बरोबर आहे. बरोबर असलेला पर्याय निवडून त्याच्या दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहा :

1. 1453 साली कॉन्स्टेंन्टिनोपल शहर यानी काबीज केले

(A) अरबानी

(B) ऑटोमन तुर्कानी

(C) इटलियानी

(D) पोर्तुगीजानी.

2. छोड़ो भारत चळवळीने काँग्रेस व्यतिरिक्त नेत्याना नायकत्व दिले. खालील पैकी काँग्रेस व्यतिरिक्त नेता ओळखा.

(A) कस्तूरबा गाँधी

(B) डॉ० बी० आर० आंबेडकर

(C) जयप्रकाश नारायण

(D) मौलाना अबुल कलाम आझाद.

3. चीनचे पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांच्या बरोबर पंचशील तत्वावर सही केलेले भारताचे पंतप्रधान

(A) जवाहरलाल नेहरू

(B) लाल बहादूर शास्त्री

(C) इंदिरा गांधी

(D) अटल बिहारी वाजपेयी.

4. बालिकांच्या सबलिकरणासाठी "बालिका संघाची" स्थापना आणि त्याचे निर्वाहन यांच्या कडून केले जाते.

(A) बालहक्क रक्षण समिती

(B) बाल ग्रामसभा

(C) बाल सुरक्षा समिती

(D) अंगणवाडी

5. कारगील जवळील 'द्रास' येथे सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. कारण हे

(A) सुर्याची किरणे लंबरूप पडत असलेल्या प्रदेशात असल्याने

(B) समुद्राजवळ असल्याने

(C) अती उंच प्रदेशात असल्याने

(D) नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या प्रभावात असल्याने

6. आमच्या संविधानाचे ( घटना ) कलम 21 हे सांगते.

(A) अनुसुचीत जाती / जमाती यांच्यात शेक्षणक आवड निर्माण करण्यासाठी पाठींबा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

(B) अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यास संधी देणे

(C) सामाजिक न्याय आणि लोकांच्या कल्याणासाठी संधी देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे

(D) शिक्षण हा मलांचा मूलभूत हक्क आहे.

7.सरकार खालिपैकी यामधून करेतर महसूल जमा करते.

(A) वस्तू आणि सेवा कर ( GST )

(B) विविध प्रकारचा दंड

(C) आयात-निर्यात कर

(D) स्टँप ड्यूटी.

8. "धवल क्रांतीचे जनक" म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक हे आहेत.

(A) डॉ० प्रताप रेडी

(B) नरेश गोयल

(C) वर्गिस कुरियन

 (D) किरण मजुमदार शहा.II. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा :

9. बंगालमध्ये 'दुहेरी राज्यव्यवस्था' कोणी लागू केली ?

10. राजा राममोहन रॉय याना सतोपद्धत विरुद्ध संघर्ष करण्यास गव्हर्नर जनरल विल्यम बेंटीक याने कसे सहकार्य केले ?

11. मानवी हक्क दिवस केंव्हा साजरा केला जातो ?

12. स्त्री-भ्रूण हत्या म्हणजे काय ?

13. उष्ण कटिबंधातील पानझडी अरण्याना 'मान्सून अरण्ये' असे ही म्हणतात. का ?

14. लोकसंख्येची घनता म्हणजे काय ?

15, वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय ?

16. ग्राहक चळवळीच्या इतिहासात 15 मार्च, 1962 हा दिवस का महत्वाचा समजला जातो ?
SSLC EXAM JUNE 2019

1. खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एक पर्याय बरोबर आहे, बरोबर असलेला पर्याय निवडून त्याच्या इंग्रजी मुळाक्षरासह पूर्ण उत्तर दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहा.

1. युरोपियन देशांच्या व्यापारावर या व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती.

(A) इटलीच्या व्यापाऱ्यांची

(B) अरब व्यापाऱ्यांची

(C) फ्रेंच व्यापाऱ्यांची

(D) भारतीय व्यापाऱ्यांची

2. 'दत्तक वारसा नामंजूर' याची ओळख करुन देणारा ब्रिटीश गव्हर्नर जनरल

(A) लॉर्ड वेलस्ली

(B) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(C) लॉर्ड डलहोसो

(D) लॉर्ड विल्यम बैंटिक,

3. शीत युद्ध झालेल्या राष्ट्रांचा योग्य गट हा आहे

(A) अमेरिका ( यू. एस. ए. )- चीन

(B) चीन  - सोवियत रशिया

(C) अमेरिका ( यू. एस. ए. )- जपान

(D) अमेरिका ( यू. एस. ए. )- सोवियत रशिया,

4. ताश्कंद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कराराचे वर्ष

(A) 1962

(B) 1963

(C) 1965

(D) 1966.

5. असंघटित क्षेत्राचे एक लक्षण हे आहे.

(A) कामगार

(B) स्थलांतर

(C) मजूर

(D) वेतन ( मजूरी ) रहित कामगार,

6. भारतातील सर्वात उंच शिखर हे आहे.

(A) हिमालय

(B) गौरी शंकर

(C) माऊंट एवरेस्ट

(D) गोडविन ऑस्टीन / के2.

7. खालील पैकी या अरण्यातील वनस्पतीच्या फांद्याना पारंब्या ( मुळे) फुटतात.

(A) सदाहरित अरण्ये

(C) मैंग्रोव्ह अरण्ये

(B) मान्सून अरण्ये

(D) पर्वतीय अरण्ये,

8. एक वर्षाच्या मुदतीत त्या देशात उत्पादित झालेल्या वस्तु व सेवांची किंमत म्हणजे

(A) राज्याचे उत्पन्न

(C) राज्य आणि राष्ट्रीय उत्पन्न

(B) राष्ट्रीय उत्पन्न

(D) दरडोई उत्पन्न

9. टेलीशॉपींग म्हणजे

(A) घरी बसून व्यापार करणे

(B) आंतरराष्ट्रीय स्थरावर व्यापार करणे

(C) स्वदेशी ( घरगुती ) व्यापार

(D) किरकोळ व्यापार

10. अन्न आणि कृषीविषयक संघटनेचे ( FAO) मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे.

(A) रोम

(C) न्यूयॉर्क

(B) नवी दिल्ली

(D) जिन्हेवा.


II. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा :    14 x 1 = 14

11. ब्रिटिशानी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतात राजकीय अधिकार कसा स्थापन केला ?

12. बंगालच्या फाळणीचे कारण कोणते ?

13. आर्थिक निःसारणाच्या सिद्धांताचे संस्थापक कोण ?

14. ब्रिटिशांच्यात टिपू विरुद्ध द्वेषाची भावना का वाढली?

15. हलगलीच्या बेरडानी ब्रिटिशांच्या विरुद्ध का बंड पुकारले ?

16, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सतत संघर्ष होण्याचे कारण काय ?

17. शांत दरी चळवळ ( सायलेंट केली आंदोलन ) झालेले ठिकाण कोणते ?

18, लाल माती कशी बनते ?

19, कोणत्या अरण्यात चंदन वनस्पतीचे वाद होते ?

20. गनीजला मिश्र धातू ( ferro-alloy ) असे का म्हणतात ?

21. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर ( GST) का लागू केला ?

22, आजच्या दिवसात ग्राहकांचे संरक्षण करणे का महत्वाचे आहे ?

23. जमाव म्हणजे काय ?

24. अरण्ये सदा हिरवीगार राहण्याचे मुख्य कारण कोणते ?SSLC EXAM MARCH / APRIL 2019

1. खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एक पर्याय बरोबर आहे. बरोबर असलेला पर्याय निवडून त्याच्या इंग्रजी मुळाक्षरासह पूर्ण उत्तर दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहा

1. 1909 मध्ये स्वतंत्र मतदार संघ' निर्माण करण्याचे कारण हे होते.

(A) मुसलमानाना विशेष प्रतिनिधित्व देण्यासाठी

(B) युरोपीयनाना स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यासाठी

(C) शिखाना विशेष प्रतिनिधित्व देण्यासाठी

(D) ख्रिश्चनांना काही जागा राखीव ठेवण्यासाठी.

2. पहिल्या अँग्लो-म्हैसूर युद्धाचा शेवट या तहाने झाला.

(A) म्हैसूरचा तह     

(B) मद्रासचा तह

(C) मंगलोरचा तह  

(D) श्रीरंगपट्टणचा तह.

3. 'न्यु इंडिया' हे वृत्तपत्र सुरु केलेली व्यक्ती

(A) राजा राममोहन राय

(B) महात्मा गांधी

(C) अॅनी बेझंट

 (D) दयानंद सरस्वती,

4. संयुक्त राष्ट्र संघटनेने ( UNO) मानवी हक्कांची घोषणा केलेले वर्ष हे आहे.

(A) 1945

(B) 1950

(C) 1947

(D) 1948.

5. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समीतीशी संबंधीत असलेले बरोबर विधान हे आहे.

(A) या मंडळात 15 कायमचे सभासद आहेत

(B) हे एक संयुक्त राष्ट्रसंघाचे ( UNO ) केंद्र ( कबिनेट ) असल्यासारखे आहे.

(C) याचे मुख्य कार्यालय पॅरिस या ठिकाणी आहे

(D) अलिकडे भारताला याचे कायमचे सदस्यत्व मिळाले आहे.

6, "अदृष्य भूक" म्हणजे

(A) पोषण  

(B) कुपोषण

(C) श्रीमंत लोकांची भूक

 (D) समतोल आहार,

7. काळी माती ही कोरडवाहू शेतीसाठी योग्य आहे. याचे कारण

(A) ही जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळते

(B) यामध्ये कमी ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते

(C) या मध्ये जास्त काळ ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते

(D) स्फटिकमय खडकांची झीज होऊन ही माती बनते

8. दामोदर नदीखोरे योजनेच्या निर्मीतीचा योग्य परिणाम

(A) दामोदर ही 'बंगालचे अश्रु' राहिली नाही

(B) दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले

(C) मोठा भूकंप होण्यास कारण बनले

(D) प्रमुख औद्योगिक प्रदेश बुडाला.

9. प्रत्यक्ष कराचे उदाहरण हे आहे.

(A) व्हट ( VAT)

(B) केंद्र अकारी कर

(C) स्टप ड्यूटी

 (D) सेवा कर

10. एका व्यक्तीने 15 लाखाला एक कार खरेदी केली, आता त्या कारमध्ये काही समस्या आहेत, कार कंपनी त्याला योग्य प्रतिसाद देत नाही, तर त्या व्यक्तीने कोणत्या संस्थेकडे तक्रार करावी?

(A) जिल्हा ग्राहक मंच

(B) राज्य ग्राहक आयोग

(C) राष्ट्रीय ग्राहक आयोग

(D) आंतरराज्य ग्राहक मंच,


II. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा

11. शुद्धी चळवळ का सुरु झाली ?

12. भारतीय सैनिकानी 'रॉयल एन्फिल्ड बंदुका' वापरण्यास का नकार दिला ?

13. सरदार वल्लभभाई पटेल याना भारताचे पोलादी पुरुष म्हणतात', का ?

14. सरकारने तिबेटियन निर्वासितांची समस्या कशी सोडविली ?

15. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचे कृषी उत्पादन का ढासळले ?

16. निःशस्त्रीकरण म्हणजे काय ?

17. 'रिपब्लीक' हे पुस्तक कोणी लिहिले ?

18. देवदासी पद्धत ही एक अमानवीय कृत्य आहे. का ?

19. भारतातील कोणत्या राज्याचा प्रदेश जास्त अरण्याने व्यापला आहे ?

20. भारताच्या पूर्व किनापरट्टीच्या नदी मुखाजवळील त्रिभुज प्रदेशात कोणते अरण्य आढळते ?

21.बांधकाम करणाऱ्या कंपन्या (construction companies)अॅल्युमिनियमची मागणी जास्त का करतात ?

22. लोकसंख्येची घनता म्हणजे काय ?

23. घटनेतील 73 वा घटना दुरुस्ती कायदा 1993 साली का आमलात आणला ?

24. 'जागतिक ग्राहक दिन' केंव्हा साजरा करतात ?

SSLC

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.
कांही शंका असल्यास नक्की विचारा..
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.